बीड : – बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुटख्याच्या कारवाईतील गुटखा, चक्क पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीच पळवल्याचा उघड झालं आहे. हा गुटखा पळवणाऱ्या अधिकाऱ्यांसह पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी चांगलाच दणका दिला. पोलीस अधीक्षकांनी या पोलिसांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. (Beed Crime News)
बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलिसांना, गुटख्याचा कंटेनर अडवायला पाठविले होते. मात्र पोलिसांनी तो अडवल्यानंतर त्यातील 50 पोते गुटख्याऐवजी, कारवाईत केवळ 27 पोते दाखविला आणि 23 पोते गुटखा पाटोदा शहरातील हुले कन्स्ट्रक्शन कार्यालयात पसार केला. ही बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी संबधित पोलिसांचं निलंबन केलं.
सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. त्यांच्या निलंबन आदेशातचं हे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे . (Beed Todays News)
दरम्यान बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात, आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्याच्या अवैध धंद्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र अनेक ठिकाणी गुटखा व्यापाऱ्यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्याचा प्रत्यय आता बीडच्या पाटोदा येथील कारवाई समोर आलाय.
वाळू नंतर आता गुटख्याच्या अवैध धंद्यात, काही पोलीस देखील आपले हात ओले करत असल्याचं भेसूर वास्तव समोर आलं आहे. त्यामुळं अशा पोलिसांवर देखील कडक कारवाई करावी, अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






