गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील रोजिड गावात बनावट दारू पिऊन किमान 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनी गुजरातचे गृहसचिव राजकुमार यांनी सांगितले की या घटनेला गांभीर्याने घेण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
40 जणांची प्रकृती अस्थिर आहे. या लोकांना भावनगर, बोटाद आणि अहमदाबादला पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे.
काही महिन्यांपूर्वीच दिली होती तक्रार
रोजिड गावचे सरपंच जिगर डुंगरानी यांनी या घटनेसाठी सरकारी यंत्रणेला जबाबदार धरत निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, तीन चार महिन्यांपूर्वीच मी प्रशासन, एसपी, पीएसआय, तहसिलदार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर जर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. पण त्यांनी या तक्रारीकडे लक्ष दिले नाही.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळे पथक तैनात केले आहे आणि या इतर भागात बनावटी दारूची विक्री होत असेल तर हे तपासण्यासाठी सांगितले आहे.
हेही वाचलंत का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






