मोठा अपघात टळला ; पाटलीपुत्र एक्स्प्रेस अर्धे डब्बे सोडून गेली पुढे
Jalgaon News Update : लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस ( गाडी नंबर 12141) ही मुंबईकडून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ या धावत्या एक्सप्रेसचे इंजिन आणि डबे वेगवेगळे झाले
चाळीसगाव : – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्टेशन नजीक वागळे गावाजवळ धावत्या एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेसला ही घटना घडली आह
लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस ( गाडी नंबर 12141) ही मुंबईकडून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ या धावत्या एक्सप्रेसचे इंजिन आणि डबे वेगवेगळे झाले. गाडी धावत असतानाच ही घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डबे सोडून पुढे गेलेले इंजिन परत मागे आणण्यात आणि ते पुन्हा वेगळे झालेल्या डब्यांना जोडण्यात आले.
या घटनेनंतर एक्सप्रेस मधील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. प्रसंगावधान राखून सर्व नागरिक गाडीतून बाहेर पडले. दरम्यान, घटनेतील प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठलीही जिवित हानी झाली नाही.

रेल्वे प्रशासनाकडून दुर्घटना घडलेल्या रेल्वेचे डबे आणि इंजिन जोडून दुरूस्तीसाठी गाडी भुसावळ येथे हलवण्यात आली आहे. परंतु, या घटनेमुळे प्रवाशांमधून संपात व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने घटनेत कोण्यात्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु, या घटनेकडे डोळेझाक करून चालणार नाही, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून येत आहेत. दैव बलवत्तर म्हणूनच आमच्या जीवाला कोणाताही धोका पोहोचला नाही. परंतु, जर या घटनेत दुर्दैवी घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार असते? असे प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केले जात आहेत.
काय आहे नेमकी घटना?
भुसावळमार्ग लोकमान्य टिळक टर्मिनलला जाणारी पाटलीपुत्र एक्सप्रेस वाघळी स्टेशनपासून काही अंतर दूर गेल्यानंतर अचानक रेल्वेचे अर्धे डब्बे सोडून इंजिन पुढे गेली. पाटलीपुत्र एक्स्प्रेसचे अर्धे डब्बे मागेच राहिले. तर इंजिनसोबत अर्धे डब्बे पुढे गेले होते. रेल्वे दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. त्यानंतर लोकोपायलटने रेल्वे एक्स्प्रेस थांबवली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर पाटलीपुत्र रेल्वे मागे घेऊन हे डब्बे जोडून रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेचे इंजिनला सर्वे डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन डबे वेगळे झाले होते
गाडीमधील गार्डला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने
वायरलेसवरून लोकोपालटला ही घटना कळवली. त्यानंतर डब्ब्यापासून पासून वेगळे झालेले इंजिन पुन्हा डब्यांना जोडण्यात आले अशी माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






