झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
इंदापूर :- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर तालुका पदाधिकारी यांनी आज पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्माच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांची इंदापूर येथील निवासस्थानी भेट घेत युवा मोर्चाच्या कार्याचा आढावा दिला. यावेळी तालुक्याच्या विविध आघाड्या करण्याच्या संदर्भात चर्चा झाली.
आढावा बैठकीमध्ये पुढील मुद्द्यांवरती चर्चा झाली .
आढावा बैठकीत प्रमुख मुद्दे –
1: महिला कार्यकारणी ची बांधणी तसेच संघटन करणे. समाजातील वंचित घटकांच्या पर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोहचवणे
2 बचत गटांना येणाऱ्या काळात जास्तीची मदत मिळवून देण्याचे कायदा व सुव्यवस्था च्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात कोणत्या मार्गाने सर्वसामान्य लोकांना मदत होईल त्या साठी चे कार्य या बाबत चर्चा..
यावेळी त्यांनी युवा कार्यकर्त्यांना तुम्ही कामाला लागा असा आदेश दिला.यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर तालुकाध्यक्ष तेजस देवकाते, संघटन सरचिटणीस राजेंद्र पवार, युवा वॉरियर्स प्रदेश संयोजक प्रशांत गलांडे, संघटक मंगेश लोंढे, सोमनाथ भोसले व आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






