जळगाव :- जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेतला रंगेहात हात अटक करण्यात आली आहे. मगन गोबा भोई रा. वाघ नगर, जळगाव असे लाच घेणाऱ्या शिपाई कर्मचाऱ्याचे नाव असून या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकार?
तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन भोई हे संगायो योजनेचे फार्म जमा करता. संगायो योजना निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी त्यांच्याकडे आईचे काम करून देण्यासाठी तीन हजार व तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी दोन हजार मागितले होते मात्र आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी दोन हजार मागितल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी एक वाजता लाच स्वीकारताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
सापळा रचत पकडले
आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी २ हजार रूपये मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार आज (२७ जुलै) दुपारी १ वाजेच्या सुमारास सापळा रचून शिपाई मगन भोई याला लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. तक्रारदार मुलगी व आईसोबत वास्तव्यास आहेत.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक (रीडर) सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुले, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, पोलिस कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टैबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.
हे वाचलंय का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






