वालचंदनगर सहकारी बँकेच्या चेअरमन पदी राजेंद्र रणमोडे व व्हाईस चेअरमनपदी सौ.राजलक्ष्मी दळवी यांची निवड .

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंद नगर : ( ता. इंदापूर )
वालचंदनगर सहकारी बँक वालचंदनगर संचालक मंडळ निवडणूक २०२१-२२ ते २०२६-२७ ची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. आज दिनांक २६ जुलै २०२२ रोजी राजेंद्र रणमोडे यांची चेअरमन पदी तर व्हॉइस चेअरमनपदी
सौ.राजलक्ष्मी विष्णू दळवी यांची निवड करण्यात आली.
भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रचार प्रमुख संजय नकाते यांच्या नेतृत्वाखाली वालचंदनगर सहकारी बँक वालचंदनगर संचालक मंडळ निवडणूक निवडणुकीच्या रणधुमाळीत

स्वाभिमानी सहकारी पॅनलने १२-० ने विजय मिळवत वालचंदनगर बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले . या बँकेची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी जे पी गावडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली यामध्ये चेअरमन पदी राजेंद्र सूर्याजी रणमोडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी सौ.राजलक्ष्मी विष्णू दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक
संतोष हनुमंत गायकवाड,
विठ्ठल नामदेव चव्हाण,
शरद अर्जुन चव्हाण,
संदीप परशुराम फाळके,
संजय नारायण भरते,
शशांक सुधाकर माडगे,
राजेंद्र सूर्याजी रणमोडे,
विजय शिवाजी अर्जुन,
विजय सोपान मस्के,
जीवन लक्ष्मण भोरे,
सौ.राजलक्ष्मी विष्णू दळवी,
सौ पार्वती गोविंद बनसोडे उपस्थित होते.

वालचंदनगर चे उपसरपंच व पॅनल प्रमुख श्री संजय नकाते अनिल लावंड, अनिल शहा, अरविंद अंबुदरे, राहुल बावडेकर, किरण कदम, अवि अनपट, वसंत घाडगे, सारंग रणमोडे, नामदेव शिंदे, शरद हनुमंते, आनंद झेंडे, निलेश गुळवे, विक्रम मोरे इत्यादींनी नवनिर्वाचित चेअरमन चेअरमन व संचालक मंडळ यांचे अभिनंदन केले.

टीम झुंजार