जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाढेल. मन काहीसे विचलीत राहील. आत्मविश्वास कायम ठेवावा. सामाजिक भान राखून वागाल.
वृषभ :-
व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळावा. उत्साहवर्धक घटना घडतील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल.
मिथुन :-
कामाची धांदल वाढू शकते. काही अनपेक्षित बदल संभवतात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल. जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल. अनावश्यक खर्च टाळावा.
कर्क :-
मुलांशी मतभेद संभवतात. व्यावसायिक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळावी लागेल. आळस बाजूला सारून कार्यमग्न रहा. आवडते पुस्तक वाचाल.
सिंह :-
धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. सकारात्मकतेने वावराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातापायास किरकोळ इजा संभवते. नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
कन्या :-
खूप दिवसांनी जवळच्या मित्राची गाठ पडेल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल. तरुणांचे विचार जाणून घ्याल. कलाकारांना काही तरी नवीन करण्याची संधि मिळेल. केलेली धावपळ लाभदायक ठरेल..
तूळ :-
रागावर अंकुश ठेवावा. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल. मन काहीसे विचलीत राहील. कामाच्या ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागू शकते.
वृश्चिक :-
सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या ताणाचा परिणाम जाणवेल. जुने वाद मिटवावेत.
धनू :-
प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर कराल. दिवस काहीसा अनुकूल राहील. रखडलेली कामे मार्गी लावाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. बौद्धिक चकमक टाळावी.
मकर :-
कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. भावंडांची मदत मिळेल. मनावरील दडपण कमी होईल. घरात अधिकारवाणीने वावराल. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल.
कुंभ :-
अडचणीतून मार्ग काढता येईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. महिला वर्ग करमणुकीत रमेल. विरोधकांवर मात करता येईल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते.
मीन :-
कटू बोलणे टाळा. एकतर्फी विचार करू नका. हितशत्रू पासून सावध रहा. उधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






