????????????????????️ विद्यार्थ्यांनों आत्मनिर्भर व्हा! सांगवी आश्रमशाळेतील गुण गौरव सोहळ्यात वनक्षेत्रपाल आनंद मेश्रामांचे मार्गदर्शन ????????

Spread the love


सांगवी ( शिरपुर ) : – पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी ता. शिरपूर येथे दिनांक २७ जुलै रोजी सायन्स आॉलंपियाड व अभंग गायन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. *कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगवी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम * तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत पेट्रोलियम चे अभियंता आशुतोष धनस्कर, संजयजी तांबळे, वनविभागाचे शेटे भाऊसाहेब, बिपिन महाजन उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका काश्मिरा पाटील यांनी आश्रमशाळेत घेण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
स्पर्धेच्या युगात आश्रम शाळेचे विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांनी सायन्स आॉलंपियाड सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परिक्षेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली असल्याने त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाचा सायन्स आॉलंपियाड या राष्ट्रीय परिक्षेचा निकाल नुकताच आला असून इयत्ता पाचवीतील मनिषा गारसिलाल पावरा ही विद्यार्थीनी सुवर्णपदक विजेती ठरली . उर्वरित तेरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले .

सर्व गुणवंतांना प्रशस्तिपत्र व पुस्तकं देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपन्न झालेल्या दिंडी सोहळा व अभंग गायन कार्यक्रमात सहभागी ३२ विद्यार्थीनींना प्रशस्तिपत्र व शैक्षणिक साहित्य भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सायन्स आॉलंपियाड बाबत उपशिक्षक सचिन नाथजोगी यांनी तर अभंग स्पर्धे बाबत उपशिक्षक योगेश माळी यांनी माहिती दिली. विलास मराठे सरांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे आशुतोष धनस्कर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी.


अध्यक्षीय भाषणात


मेश्राम साहेबांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनाची सवय लावून आत्मनिर्भर व्हावे. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत राहिलात तरी पर्यावरण संवर्धन देखील करा .


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन गवळी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कल्पेश मावची यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विठोबा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास पाटील, रविंद्र विसावे, योगिता वळवी, मिनाक्षी पाटील, राहूल चकणे, निरंजना पावरा तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार