मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच आता अब्दुल सत्तार यांनी मोठं व्यक्तव्य केल आहे. आमच्या 50 जणांपैकी पहिला राजीनामा मी देणार आहे, असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
“मी अर्जुन खोतकर आणि हेमंत पाटील यांना भेटण्यासाठी दिल्लीत आलोय. त्यांना निर्णय घेण्यासाठी इतका उशीर का लागतोय, हे जाणून घेण्यासाठी मी दिल्लीत आलोय,” असं सत्तार म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान केलं आहे. याविषयी बोलताना सत्तार म्हणाले, “31 तारखेला माझ्याकडे महामेळावा आहे, मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे. त्यांचे आभार मानणार आहे.त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सिल्लोड मतदारसंघात ठेवलेला आहे.
“माझं मन स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची परवानगी दिली, तर मी राजीनामा देणार आहे.”
येत्या 3 तारखेच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही ते म्हणाले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे त्यांच्या दौऱ्यानिमित्त फिरत असताना, प्रत्येक सभेत बंडखोर आमदारांना आव्हान देत आहेत की, राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला अब्दुल सत्तारांनी हे उत्तर दिलंय.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






