Dhule News : राज्य उत्पादन शुक्ल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
धुळे : – राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाच्या आणि नाशिक विभागाच्या भरारी पथकाने धुळ्यात मोठी कारवाई करत मद्य तस्करांना मोठा दणका दिला आहे. मुंबई – आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात सापळा रचत आयशर गाडीतून वाहतूक होणारा परराज्यातील विदेशी मद्यसाठा पकडला आहे. राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाने आयशर गाडीसह सुमारे सव्वा कोटीचा विदेशी मद्यसाठा असा एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाला गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर धुळे शहर परिसरातील आर्वी शिवारात मुंबई आग्रा महामार्गा लगत असलेल्या हॉटेल शांतीसागरजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला. या ठिकाणी गोवा राज्यातील विदेशी मद्याचा साठा अवैधरीत्या वाहतूक करणार्या MH 12 LT 4255 क्रमांकाच्या आयशरमधून वाहतूक करण्यात येत होता.
वाहनाची तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याचा साठा मिळून आला. यामध्ये १ कोटी २३ लाख ३७ हजार ९२० रूपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा आणि २२ लाखांचा ट्रक असा एकूण १ कोटी ४५ लाख ३८ हजार ४२० रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच केरळ व कर्नाटक येथील वाहन चालक शालू. एके रामनकुट्टी (वय ४२, रा. आसरखंडी, केदावुर, पो.तामरचेरी, जि.कोझीकोड केरळ) व क्लीनर शिवानंद शंकर कट्टीकार (वय ३२ रा. बेन चिनमर्डी जि.बेलगम, कर्नाटक) यांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, राज्याचे संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ तसेच धुळे विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर, भाऊसाहेब घुले यांनी केली.
हे वाचलंत का ?
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प