एरंडोल प्रतीनिधि
एरंडोल:- सध्या एरंडोल तालुक्यात विजचोरी वर नियंत्रण करण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे वीज चोरी करणाऱ्या गिऱ्हाईकांच्या घरांवर तालुक्यात संपूर्ण छापे मारून सुरू आहे. या अनुषंगाने आज दिनांक 30 ऑगस्ट सकाळी एरंडोल -तालुक्यातील पिंपळकोठा विभागांतर्गत जावखेडा गावात महावितरणतर्फे वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक गेले असतात या पथकावर एकाने हल्ला करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे.
पिंपळकोठा विभागांतर्गत जवखेडा गावात अभियंता इच्छानंद पाटील, जनमित्र अक्षय महाजन , पंकज येवले, सुनील महाजन यांचे पथक वीज चोरी विरोधात मोहीम राबवीत होते. दरम्यान, मनोज प्रताप पाटील या ग्रामस्थाने आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा आकोडा काढून टाकल्याने मनोज पाटील यांनी लाडकी दांडक्याने पथकातील सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीत अक्षय महाजन हे जखमी झाले आहेत. यांनतर जखमी अक्षय महाजन यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
पहा व्हिडिओ :
सर्व वैद्यकीय अहवाल आल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येईल, असे एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले आहे.
हे वाचलंत का ?
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.