मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. अतिशय वेदनादायी पद्धतीनं विद्यार्थ्यानं स्वत:चा शेवट करून घेतला. विद्यार्थ्यानं त्याचे दोन्ही हात विजेच्या तारेनं बांधले. त्यानंतर तारेचं दुसरं टोक प्लगमध्ये घातलं आणि झाडून स्विच ऑन केला. शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला.
भोपाळ : – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. अतिशय वेदनादायी पद्धतीनं विद्यार्थ्यानं स्वत:चा शेवट करून घेतला. विद्यार्थ्यानं त्याचे दोन्ही हात विजेच्या तारेनं बांधले. त्यानंतर तारेचं दुसरं टोक प्लगमध्ये घातलं आणि झाडून स्विच ऑन केला. शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
कुलदीप असं मृत तरुणाचं नाव असून तो २० वर्षांचा होता. काही दिवसांपूर्वीच त्यानं बी-फार्ममध्ये प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केली होती. सोमवारी त्याचं ऍडमिशन होणार होतं. २६ ऑगस्टला कुलदीपचा वडिलांशी संवाद झाला होता अशी माहिती कुटुंबियांनी दिली. सगळं काही व्यवस्थित असल्याचं कुलदीपनं वडिलांना सांगितलं होतं.
शनिवारी सकाळी वडिलांनी कुलदीपला फोन केला. मात्र त्याचा फोन स्विच्ड ऑफ होता. त्यामुळे वडिलांनी कुलदीपच्या घरमालकाला कॉल केला. आपण कामावर असून घरी जाऊन बघतो, असं घरमालकानं सांगितलं. संध्याकाळी घरमालक कुलदीपच्या खोलीबाहेर पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. अनेकदा आवाज दिल्यानंतरही कुलदीपनं दरवाजा न उघडल्यानं घरमालकानं पोलिसांना बोलावलं.
कुलदीप सिहोर जिल्ह्यातील बिलकिसगंजचा रहिवासी होता. सध्या तो भोपाळमधील नीलबड परिसरात भाड्यानं राहात होता. कुलदीप खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती शनिवारी संध्याकाळी ७ वाजता पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी त्यांना कुलदीप मृतावस्थेत आढळून आला. त्याचे हात विजेच्या तारेनं बांधलेले होते. कुलदीपनं आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कुलदीपच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. कुलदीपनं आधी स्वत:चे दोन्ही हात बांधले. त्यानंतर तारेचं दुसरं टोक प्लगमध्ये टाकून स्विच ऑन केला. त्यामुळे करंट लागून कुलदीपचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुलदीपच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे
हे वाचलंत का ?
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.