धुळे : – सध्या महाराष्ट्रात गो तस्करीचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच गो तस्कर आता विविध शक्कल लढवून गुरांची तस्करी करण्याचे नवनवीन मार्ग अवलंबत आहे. आता तर गो तस्करांनी तर हद्दच केली. चक्क रुग्णवाहिकेमधूनच गुरांची तस्करी केल्याचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी उघड केले आहे. गो तस्करांची ही अनोखी शक्कल बघून पोलीसही चक्रावले.( Police Rescues 6 Cows )
रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकेमधून गुरांच्या वाहतुकीचा संतापजनक प्रकार शिरपूर शहर पोलिसांनी वाघाडी येथे उघडकीस आणला. सहा गायी आणि रुग्णवाहिका ताब्यात घेत पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली. मध्यप्रदेशातील एका रुग्णवाहिकेतून गायींची वाहतूक करण्यात येत असून बोराडी मार्गे शिरपूरकडे येत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने वाघाडी येथे सापळा रचला होता. सकाळी सातच्या सुमारास पोलीस पथकाने एमपी ०९ एफए ४५९३ क्रमांकाची फोर्स कंपनीची रुग्णवाहिका थांबवून चौकशी केली असता रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकेमधून गुरांची वाहतूक होत असल्याचे धक्कादायक कृत्य उघडकीस आले. शिरपूर पोलिसांच्या पथकाने सदर रुग्णवाहिका ताब्यात घेत यामधून मधून ३६ हजार रुपये किमतीच्या ६ गायींची सुटका करून २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. चालक विजय पौलाद चव्हाण (वय २३ रा. महू ता. जि. इंदूर मध्य प्रदेश) यास अटक करण्यात आली.
हे वाचलंत का ?
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४