कौतुकास्पद ! मोठ्या शिताफिने पकडला अवैध दारू साठा , इंदापूर पोलीस स्टेशन यांची कामगिरी..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.

इंदापूर :- दिनांक ३०/०९/२०२२ रोजी पहाटेच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी बावडा रोड त्याचप्रमाणे निमगाव केतकी रोड या दोन्ही ठिकाणी कोंबिंग व नाकाबंदी साठी पोलीस अधिकारी व अंमलदार नेमलेले होते. त्यानंतर बावडा भागात रात्रगस्त करीत असलेले सपोनी नागनाथ पाटील यांनी खोरोची ते रेडणी जाणाऱ्या ओमीनी गाडीला हात करून थांबण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालकाने संशयपदरीत्या रेडणी मार्गाने भरधाव वेगाने गाडी पळवू लागला.

त्यानंतर सपोनी नागनाथ पाटील यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब यांना दिल्यानंतर दुसरी टीम त्या गाडीला कव्हर करण्यासाठी निमगाव केतकी ते काटी रोडने नाकाबंदी करत पुढे आली. त्यानंतर त्या गाडीचा पाठलाग केल्यानंतर सदरची गाडी निमगाव केतकी हद्दीतील पान बाजार या ठिकाणी त्या गाडीतील तीन इसम अंधारामध्ये आडोशाला लावून गाडीतून पळून गेली. त्या ठिकाणी पोलीस अधिकारी व स्टाफ जाऊन गाडीची पाहणी केली असता सदर गाडीमध्ये बे कायदेशीरपणे देशी विदेशी कंपन्यांची दारूची बॉक्स दिसून आले.

तात्काळ दोन पंचांना त्या ठिकाणी बोलावून त्या अवैध दारूचा सविस्तर पंचनामा करून एकूण ४५९९०/-रुपयां च्या किमतीची देशी-विदेशी कंपनीची दारूचे आठ बॉक्स इंदापूर पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतले आहे. सदर दारू वाहतुकी साठी वापरण्यात आलेले वाहन ओमीनी कार MH12 AN 6630 किंमत रुपये २६००००/-ची ओमीनी गाडी ताब्यात घेऊन जप्त केली. असा एकूण ३०५९९०/-रुपयाचा मुद्देमाल सदरच्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे. सदर गाडीचा चालक व मालक यांच्याविरुद्ध भादवि कलम २७९,४२७ ३४ व मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(ड) प्रमाणे इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कारवाई माननीय डॉ. अभिनव देशमुख सा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय गणेश इंगळे पोलीस उपाधीक्षक, बारामती विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सपोनि नागनाथ पाटील,सपोनि प्रकाश पवार, सहाय्यक फौजदार कदम पोलीस हवालदार गायकवाड, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस शिपाई चोरमले, गोसावी, शेख,राखुंडे यांनी मिळून केली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार