तालुक्यात सोन्याच्या दागिन्यांना पाॅलीश करण्याच्या बहाण्याने ६० हजारांचे सोन्याचे दागिने घेवून दोन भामटे लंपास

Spread the love

कासोदा l प्रतिनिधी
कसोदा :-
विश्वास संपादन करून सोन्याच्या दागिन्यांना पाॅलीश करण्याच्या बहाण्याने ६० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना दि. १४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा या दरम्यान एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथे घडली याबाबत कासोदा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की कासोदा येथुन जवळच असलेल्या वनकोठे येथील नागेश्र्वर शेनपडू पाटील हे घरी नसतांना काही अज्ञात दोन व्यक्तींनी घरात असलेल्या नागेश्र्वर पाटील यांच्या आईला घरातील देवास पाॅलीश करून देतो असे सांगितले व देवांना पाॅलीश देखील करून देत विश्वास संपादित केला व लिक्विड शिल्लक राहिले असल्याचे सांगत तुमचे सोन्याचे दागिने देखील पाॅलीश करून देतो असे सांगत

त्यांच्या जवळ असलेले ४ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या रिंगा, ३ ग्रॅम वजनाची पोत, २ ग्रॅमचे पँडल, १ ग्रॅमचे मनी, २ ग्रॅम सोन्याचे कानातील लटकन तसेच ५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे काप असे एकूण अंदाजित ६० हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन मोटरसायकलवरून पोबारा केला. याबाबत नागेश्र्वर शेनपडू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कासोदा पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायते यांच्या मार्गदर्शनात पो. काँ. युवराज कोळी, जितेश पाटील, समाधान तोंडे, प्रवीण हटकर, इम्रान पठाण हे करीत आहेत. दरम्यान कासोदा गावात व परिसरात दिवसाढवळ्या चोऱ्यांच्या घटना मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असून चोरांना खाकीचा धाक राहिला नाही काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार