धक्कादायक : भररस्त्यात तरुणाला भोसकले,संक्रांतीच्या रात्री तरुणाला संपवलं ; घटनेने नागरिकही हादरले ‌, बड्या हस्तीचा हात ?

Spread the love

चाळीसगाव : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील पोदार शाळेजवळ मकर संक्रातीच्या रात्री भरवस्तीत दोन गटांमध्ये असलेल्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल रविवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दिनेश ऊर्फ भावडू वाल्मिक जाधव (वय २८, रा. पवारवडी, स्टेशन रोड चाळीसगाव) असं मयत तरुणाचं नाव आहे.

या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार ते पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे, यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मयत दिनेश ऊर्फ भावडु वाल्मिक जधाव

काय आहे घटना ?

चाळीसगाव शहारतील पोदार शाळेजवळ काल ६.४० वाजेच्या सुमारास मयत दिनेश ऊर्फ भावडु वाल्मिक जधाव हा त्याचा मित्र निखील राजपूत यांच्यासोबत गप्पा मारत बसला होता. अंकित महेंद्र मोरे, संकेत महेंद्र मोरे, अनिकेत महेंद्र मोरे, मुकेश उर्फ भुर्‍या मोरे (सर्व रा.हनुमानवाडी), रोहीत उर्फ पावट्या अशोक गवळी (रा. शिवाजी चौक), हर्षल दिपक राठोड (रा.जुना मालेगाव रोड), शाम उर्फ भोला पूर्ण नाव माहित नाही व इतर पाच अनोळखी इसम सर्व जण बुलेट व अन्य दुचाकींवर त्याठिकाणी आले.

त्यानंतर “दिनेश हा सुमित भोसले सोबत राहतो. हा पण जास्त मातला आहे. याचा काटा काढावा लागेल”, अशी धमकी देवून सर्वांनी शिवीगाळ करत दोन ते तीन जणांनी त्यांच्या हातातील चाकूने मयताच्या गळ्याच्या खाली, छातीवर व पोटावर भोसकून गंभीर जखमी केले. तसेच इतरांनी लाथाबुक्यांनी व लाकडी दांड्यांनी मारहाण करुन त्याची हत्या केली. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला वाल्मीक रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करत आहेत. आज सोमवारी मयत दिनेश जाधव यांच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हत्येमागे अनेक बड्या हस्तीचा हात?

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगावात गॅंगवॉर वार उफाळून आले असून चाळीसगावच्या शांततेला गालबोट लागले आहे. कालच्या घटनेमुळे पुन्हा शहरात भीती तसेच तणावपूर्ण वातावरण झालं आहे. दिनेश जाधव यांच्या हत्येमागे अनेक बड्या हस्तीचा हात असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार