चाळीसगाव : महिलांसह अल्पवयीन तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कुठल्याही प्रकारे थांबता थांबत नाही आहे. अशातच चाळीसगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रेमाचे नाटक करून ४३ वर्षीय विवाहितेसोबत शरीरसंबंध ठेवत तिला चार लाखाचा गंडा घातल्याची घटना समोर आलीय. संशयित आरोपीने 23 वर्षे हा प्रकार करीत होता. अखेर महिलेने याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेली ४३ वर्षीय महिलेस संशयित आरोपी निरंजन अशोक लद्दे (रा. चाळीसगांव) याने महिलेचा विश्वास संपादन करुन, मला बायको पासुन समाधान मिळत नाही, मला तुझी आठवण येते, मला तुझी सवय झालेली आहे, मला माझी बायको आवडत नाही, तुच माझे एकमेव प्रेम आहे असे सांगुन तिच्या संमती शिवाय ब्युटी पार्लर चाळीसगांव येथे आरोपीच्या घरी व शेतात तसेच महिलेच्या सासरी नाशिक येथे वेळोवेळी अत्याचार केले. हि घटना १९९८ पासून ते आजपर्यत सुरु होती.
पीडित महिला गरोदर राहिल्याने तिचा गर्भपात करुन घेतला, तसेच महिलेकडून वेळोवेळी एकुण चार लाख रुपये घेवुन, तसेच सन 2000 पुर्वी मला अडचन आहे असे सांगुन सोन्याची चैन व सोन्याची अंगठी घेवुन, तसेच दिनांक ४ मार्च २०२३ रोजी तु जर आता मला पुन्हा लग्न, पैसा या गोष्टीसाठी विचारले तर मी तुझ्या नावाचे पत्र लिहुन आत्महत्या करुन घेईल अशी धमकी दिली. , त्रास असह्य झाल्याने महिलेने चाळीसगाव पोलीस स्टेशनला धाव घेतली.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून गुरनं.136/2023 भादवी कलम 376 (2) (n), 420, 506 प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये सपोनि. सचिन कापडणीस हे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४