एरंडोल :- विवाहानिमित्त परगावी गेल्याचा फायदा घेत घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून अडीच लाख रुपये रोख व ४३ gram सोन्याचे दागिची चोरी करणा-या चोरट्यांना पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे व त्यांच्या सहका-यांनी तीन चोरट्यांना अटक केली
असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.पोलिसांनी आरोपींकडून ४३ gram सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.अटक करण्यात
आलेले तिघेही आरोपी कागदीपुरा भागातीलच असून मालेगाव येथील आहे.आरोपींमध्ये सासरा व जावई यांचा समावेश असून एका आरोपीचा विवाह पाच
दिवसांपूर्वीच झाला आहे.दरम्यान पोलिसांनी चोर्त्यांच्या मुसक्या आवळल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती अशी,की गांधीपुरा भागातील कागदीपुरा परिसरातील खालिद अहमद रफिक अहमद हे नातेवाईकाकडे विवाह असल्यामुळे अमरावती येथे गेले होते.विवाह कार्यक्रम आटोपून घरी आले असता त्याना घराच्या मागील दरवाजाला छिद्र पाडून आतील कडी उघडली असल्याचे दिसून आली.खालिद अहमद व परिवारातील सदस्यांनी घरातील लाकडी कपाट उघडे दिसले त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.खालिद अहमद यांनी पोलीस स्टेशनाला तक्रार दिल्यानंतर घरफोडी
प्रकरणातील आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते.
पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे हवालदार अनिल पाटील,सुनील लोहार,विलास पाटील,जुबेर खाटिक, अकिल मुजावर,प्रशांत पाटील, पंकज पाटील,यांनी तपासाचे योग्य नियोजन करून कागदीपुरा भागातीलच फिर्यादीच्या घराजवळील आझाद शेख शब्बीर चौधरी,वय-२३,मेहंदी राजा शेख अली अहमद वय-३५,कलीम शेख रहीम वय-३७ यांना
अटक केली.अटक केलेल्या तिघाही आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही मालेगाव येथील कलीम शेख याचा सासरा शेख आशिक शेख रमजान याच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले.
पोलिसांनी आझाद शेख शब्बीर चौधरी,मेहंदी रजा शेख अली अहमद,कलीम शेख रहीम या तिघांनाही अटक केली असून चौथा आरोपी शेख आशिक शेख रमजान हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तिघाही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश विशाल. धोंडगे यांनी दिला.पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने व १ लाख रुपये
रोख जप्त केले.घरफोडी प्रकरणातील तीनही आरोपी खालिद अहमद यांच्या घराजवळच राहणारे असून त्यांनी खालिद हे परगावी गेल्याचे पाहून चोरी केली. आरोपींमध्ये आझाद शेख शब्बीर चौधरी याचा २५ नोव्हेंबरला विवाह झाला आहे.विवाह झाल्यानंतर संसारिक सुख पाहण्याऐवजी आझाद यास जेलची हवा खावी लागली आहे
https://www.youtube.com/@zunjaarnews
Like share and Subscribe our youtube Channel
आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????
तसेच चौथा फरार आरोपी शेख आशिक शेख रमजान हा चोरीतील आरोपी कलीम शेख रहीम याचा सासरा असून सासरा व जावयाने चोरीमध्ये सहभाग घेतला होता.पोलिसांनी घरफोडीप्रकरणाचा तपास करून चोरट्यांना अटक केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान घरफोडीत अटक करण्यात आलेल्या तीन आरोपी पैकी कलीम शेख रहीम हा आरोपी फिर्यादी खालिद अहमद रफिक अहमद यांच्या सख्या चुलत भाऊ आहे.घरफोडी झाल्यानंतर व त्याच्या अगोदरही सतत फिर्यादी खालिद अहमद रफिक अहमद यांच्या सोबत राहत होता.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५
- आज सायंकाळी आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत हंकारे यांचे”आई-बाप समजून घेतांना”या विषयावर एरंडोलला व्याख्यान.
- दुर्देवी घटना! जामनेर नगर परिषदेच्या तरण तलावात १५ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू.
- जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान वाचन
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.२७ जानेवारी २०२५