फतेहपूर (उत्तर प्रदेश) :- जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. होणाऱ्या जावयाने शाळेत जात असलेल्या अल्पवयीन मेहुणीलाच रस्त्यातून पळवून नेले आहे. आता या जावयाविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
गावातील तरुणीचे लग्न फतेहपूर शहरातील जगदीश यांचा मुलगा विजय याच्यासोबत ठरले होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. लग्नाचा बस्ता देखील बांधून झाला होता. डिसेंबरमध्ये या दोघांचे लग्न होणार होते. दरम्यान नवऱ्या मुलीची छोटी बहीण शहरातील एका कॉलेजमध्ये शिकते. १८ नोव्हेंबरला ती पायी चालत कॉलेजला जात होती. परंतू, कॉलेज बंद झाले तरी बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली.
मुलीच्या आईने होणाऱ्या जावयाच्या घरी जाऊन मुलीबाबत माहिती घेतली. यावेळी जावईच त्या दिवशी सकाळपासून गायब असल्याचे तिला समजले आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आपल्या लहान मुलीला फसवून होणाऱ्या जावयाने तिला पळवून नेले असा आरोप करत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विजयचा शोध सुरु केला आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५
- आज सायंकाळी आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत हंकारे यांचे”आई-बाप समजून घेतांना”या विषयावर एरंडोलला व्याख्यान.
- दुर्देवी घटना! जामनेर नगर परिषदेच्या तरण तलावात १५ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू.
- जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान वाचन
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.२७ जानेवारी २०२५