MLA Chandrakant Patil : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील(chandrakant patil) व याच मतदार संघातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. दोघेही नेहमी एकमेकांवर टीका करतात. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात.
मुक्ताईनगर :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच अनेक दिवसांच्या संघर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांना विधानपरिषदेवर आमदारकी मिळाली. खडसेंना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा असताना सत्तांतर झाले. याला अनुसरुन काही दिवसांपूर्वी ‘पंगत बसली आणि बुंदी संपली’ असा आशय लिहिलेला खडसेंचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडी सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरात परतल्यावर समर्थक तसेच कार्यकर्त्यांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर भेटीसाठी आलेल्या नागरिकांना बुंदी वाटप करण्यात आली. या बुंदी वाटपाच्या कार्यक्रमाद्वारे आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खडसेंना डिवचल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व याच मतदा संघातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. दोघेही नेहमी एकमेकांवर टीका करतात. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. खडसे असो की आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. यालाच अनुसरुन आज मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या अनोख्या कार्यक्रमातून पुन्हा एकनाथ खडसेंना लक्ष्य करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी विधान परिषद निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे हे विजयी झाले. ते विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर ‘मी पंगतीत बसलो, की बुंदी कशी काय संपते रे’ असं लिहिलेला एकनाथ खडसेंचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. जळगाव जिल्ह्यात त्याची सध्या चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार तथा एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय वैरी चंद्रकांत पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आगमना निमित्ताने केलेल्या जल्लोषात नागरिकांना बुंदी वाटली आहे. या बुंदी वाटपातून एकप्रकारे आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंना डिवचले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या नागरिकांना कार्यकर्त्यांनी बुंदी वाटली. खडसेंची बुंदी संपली, मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे भरपूर बुंदी असल्याचा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी लगावला आहे. खडसे यापूर्वीही भाजपत असताना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत होते. मात्र ते पूर्ण झाले नाही. आता आमदारकीनंतरही मंत्रिपदाची खडसेंच्या कार्यकर्त्यांना आस होती. मात्र सत्तांतर झाले. यालाच अनुसरुन खडसेंची नेहमी बुंदी संपते, मात्र खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, त्यांनी कधीही आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे यावं, आम्ही त्यांना बुंदी खाऊ घालू, आमच्याकडे खूप बुंदी आहे, आमची बुंदी कधीही संपणार नाही, अशा मार्मिक शब्दात उपहास केला असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आहे.
गेल्या काळात खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद चांगलेच टोकाला गेले होते. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर झालेला हल्ला हा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत एकनाथ खडसेंनी केला होता. आता आमदार चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने साहजिकच खडसे हे आता विरोधात आहेत. त्यामुळे आगामी काळात खडसे विरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील असा सामना रंगणार असून मुक्ताईनगर तालुक्याचे राजकारण चांगलेच तापणार आहे, व बुंदी वाटप करुन खडसेंना डिवचण्याचा हा कार्यक्रम त्याचीच सुरुवात असल्याचीही चर्चा आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा
- शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व पारदर्शकपणे मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध:तहसीलदार आगळे
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम
- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत महसूल दिनाचे आयोजन
- एरंडोल शहरातील खोल महादेव मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न…
- कासोदा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शेतकरी कर्ज माफीसाठी चक्का जाम आंदोलन, दिले निवेदन.
- धरणगाव तालुक्यात घातक रसायनांपासून कृत्रिम दूध बनवून विक्री करणाऱ्यास तरुणास स्थानिक गुन्हे शाखा व धरणगाव पोलिसांनी केली अटक.
- महिलांच्या सक्षमीकरणात बचतगटाची महत्वपूर्ण भूमिका-आमदार अमोलदादा पाटील; विखरणला महिला मेळाव्याचे आयोजन.
- देशभरातील अदिवासी समाजातील प्रमुखांची नवी दिल्ली येथे बैठक; अदिवासी समाजाच्या योजनांबाबत चर्चा.
- दुर्देवी घटना! कासोद्यात घरात झोपलेल्या १२ वर्षीय बालिकेच्या सर्पदंशाने मृत्यू.
- कांताई धरण परिसरात वाळूमाफियांविरुद्ध एरंडोल तहसीलदारांची धडक कारवाई; दोन डंपर जप्त, फरार तीन डंपर चालकांविरोधातही गुन्हा दाखल.
- धरणगावात मरीआई यात्रेनिमित्त आजपासून रंगणार खुल्या कुस्त्यांची दंगल….. देशभरातील नामवंत मल्ल होणार सहभागी;- भानुदास विसावे
- एरंडोल तालुक्यातील पातरखेडा आश्रम शाळेतील ४६ विद्यार्थ्यांना गोवर ची लागण…
- एरंडोल तालुक्यातील आश्रमशाळेतील गोवर रुग्णांच्या पाहणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व WHO तज्ज्ञांची भेट.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न; 55 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
- सावदा नगर पालिकेचे दोन पाणीपुरवठा कर्मचारी विजेचा शॉक लागून गंभीर जखमी
- वंचित बहुजन आघाडीची जळगाव पूर्वची जिल्हा बैठक संपन्न; भुसावळ शहर व तालुका कार्यकारिणीसाठी मुलाखती.
- राष्ट्रवादी(शरद पवार) पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा/जिजाऊ चौकात रस्ता रोको
- दोन सख्ख्या भावांनी केला एकाच तरुणीशी विवाह, 3 दिवस सुरू होता विवाह समारंभ, कारण ऐकून चक्रावून जाल.
- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करू – माजी मंत्री डाँ.सतीश पाटील; एरंडोल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विविध कार्यक्रम संपन्न.
- राष्ट्रवादी(शरद पवार) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २४ जुलैला रास्ता रोको आंदोलन
- माजी पंचायत समिती सभापतीच्या पतीची गळफास घेत आत्महत्या;
- Viral Video: गाडीचे कागदपत्रे मागितल्याच्या राग आल्याने ट्रॅफिक पोलिसांना भरचौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण; पहा धक्कादायक व्हिडिओ
- अवाजवी वाढीव विज बिल विरोधात एरंडोल येथे नागरिकांच्या आक्रोश मोर्चा काढून दिले निवेदन.
- धक्कादायक! शेतीच्या वादातून दोघं भावांमध्ये भांडण, लहान भावाने केला मोठ्या भावाच्या खून.
- शरीरसंबंध ठेवले, व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याने पीडिता सुडाने पेटली “तुझ्या पापाचा घडा भरलाय” अन् वार करत मुंडके धडावेगळे.
- एका तरुणाच्या साखरपुडा झाला होणारी पत्नी प्रियकरासोबत फरार, रागात तरुणाने व्हाट्सअप स्टेटस ठेवले, अन् पुढे जे घडलं ते भयानक.
- उत्राण वि.का.सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमनपदी निवड झालेल्यांचा आमदार अमोलदादा पाटील यांनी केला सत्कार….
- धरणगावात कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक…
- एरंडोल बसस्थानकातील विकासकामांचा भूमिपुजनाने,प्रवाशांना सोयी -सुविधा मिळण्यास येईल सुलभता- आमदार मा.अमोलदादा पाटील
- संशयाचे भूत शिरले डोक्यात;पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून निघृण हत्या; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना.
- गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रोत्साहन आमदार मा.अमोलदादा पाटील
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.






