सकाळी उठल्या उठल्या पोट साफ व्हायला अडचण येते? २ उपाय, पोट साफ होईल -वाटेल फ्रेश

Spread the love

2 Easy Remedies For Constipation Problem : 2 योगासने आणि काही किमान डाएट टिप्स…

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की आपल्यालाही फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं ही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते. पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्यासारखं होत राहतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे पोट साफ होण्यात अडथळे येतात. मग कधी आपण घरगुती उपाय करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतो.

पोटात जळजळ होणे, गुडगुड होणे, पोट जड झाल्यासारखे वाटणे, अॅसिडीटी यांसारख्या तक्रारी निर्माण होतात. याचा आपल्या एकूण पचनशक्ती आणि आरोग्यावर परीणाम होतो. दिवसभरातील कोणत्याही वेळेला संडासला जाणं योग्य नाही. तसंच एक दिवसाआड पोट साफ होणं हेही चांगलं नाही. आरोग्य उत्तम ठेवायचे तर सकाळी उठल्यावर तासाभरात पोट साफ व्हायला हवं. यासाठी उठल्या उठल्या ग्लासभर कोमट पाणी प्या. त्यानतंर २ योगासने आवर्जून करा असे योग शिक्षिका असलेल्या स्म्रिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सांगतात. यामध्ये त्या ही आसने करुन दाखवतानाचा व्हिडिओही पोस्ट केलेला असल्याने आपल्याला ते समजायला सोपे जाते.

१. पादोत्तानासन

पाठीवर झोपायचे आणि दोन्ही पाय कंबरेतून ३० डीग्री एका रेषेत वर उचलायचे. श्वास घ्यायचा आणि रोखून धरुन त्याच स्थितीत काही सेकंद थांबायचे. सुरुवातीला १० सेकंद या स्थितीत राहता आले तरी ठिक आहे. सुरुवातीला दोन्ही पाय एकावेळी उचलून जमत नसेल तर एका एका पायाने करावे. मात्र तुम्ही गर्भधारणा केली असेल, गर्भधारणा करण्याच्या विचारात असाल आणि तुमची कंबर दुखत असेल तर हे आसन करु नये.

२. सुप्त उदराकर्षण आसन

पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्या. दोन्ही हात डोक्याखाली ठेवून श्वास घ्या आणि दोन्ही पाय एका बाजूला ट्विस्ट करा. मग श्वास सोडा आणि पाय पुन्हा मध्यभागी घ्या. पुन्हा श्वास घेऊन पाय दुसऱ्या बाजूला दुमडून घ्या.

आहाराकडे लक्ष देताना…

Pic for Google

१. याशिवाय आहारात तूपाचा आवर्जून समावेश करायला हवा. तुपामध्ये हेल्दी फॅटस असतात ज्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते.

https://www.instagram.com/reel/CqsYlPmA6K7/?igshid=YmMyMTA2M2Y=

२. तसेच फायबर हा पोट साफ होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याचाही आहारात समावेश वाढवायला हवा.

३. दिवसभराच्या रुटीनमध्ये आपण किती पाणी पितो हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

४. दिवसभराच्या आहारात किमान १ तरी फळ शरीरात जाईल असे पाहायला हवे. शक्य असेल तर पपई आणि डाळींब या फळांचा समावेश करावा.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार