घोसला,(ज्ञानेश्वर युवरे ) दि.१५..सोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरातील बनोटी वरठाण सह पाच गावांना शनिवारी सायंकाळी सहा वाजता दहा मिनिटे गारपिटीसह अवकाळीच्या पाऊस झाला त्यामुळे उन्हाळी पिकांसह कापाणी केलेले मका पिके धोक्यात आली आहे दरम्यान निंबच्या आकाराच्या गारांचा झोडपा पाच गावांना बसला आहे
सोयगाव तालुक्यात दिवस भर उन्हाची काहिली असतांना अचानक सायंकाळी बनोटी सह वरठाण,पळाशी,वाडी तिडका आणि नायगाव या गावांना अचानक गारपीट सह अवकाळी पावसाने हजेरी लावली दरम्यान पावसा पेक्षा गारांचाच पाऊस अधिक होता त्यामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला असून कापणी केलेल्या मका गहू सूर्यफूल आदी रब्बीच्या पिकं काढणी आधीच शेतात भिजली आहे त्यामुळे सीयगाव तालुक्याला मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात तीनवेळा गारपिटीने झोडपले असल्याची नोंद आपत्ती निवारण विभागात शनिवारी रात्री करण्यात आली आहे.
हे देखील वाचा
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.