छत्रपती संभाजी (गुरुदत्त वाकदेकर) : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता इंजि. दिलीप उकीर्डे व जागतिक बँक प्रकल्प विभाग, औरंगाबाद येथे कार्यरत असलेले अभियंता इंजि. संजयकुमार भोसले यांना शासकीय कार्यालयात दि. १८ मे, २०२३ रोजी समाजकंटक जयकिशन कांबळे याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या निंदनीय घटनेचा महासंघाच्या वतीने तीव्र निषेध केला आहे.
इंजि. संजयकुमार भोसले हे अधिकारी महासंघाचे सहचिटणीस तसेच कनिष्ठ अभियंता संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांना शासकीय कार्यालयातच झालेल्या धक्काबुक्कीमुळे अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता असून, प्रचंड चीड निर्माण झाली आहे. आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत अशा हिंसक घटना घडणे हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही. अशा हिंसक प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.
शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन, संबंधित समाजकंटकाला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करावी, तसेच या प्रकरणात तक्रारदार अधिकाऱ्यांवर सर्वतोपरी दबाव टाकण्याचा किंवा इजा पोहचविण्याचा संबंधितांकडून प्रयत्न होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे धीरोदात्तपणे आपले कर्तव्य बजावण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने सुरक्षा पुरविण्याचे निर्देश संबंधित स्थानिक प्रशासनाला व्हावेत, अशी अधिकारी महासंघाच्या वतीने आग्रही मागणी केली आहे.
हे पण वाचा
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!