“आंतरराष्ट्रीय न्याय दिवस” स्वामी विवेकानंद ब.शि.प्र.मं. संचलित, माध्यमिक विद्यालय चाळीसगाव येथे शिबीर संपन्न

Spread the love

प्रतिनिधी l चाळीसगाव :- माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.१७/०७/२०२३ रोजी ‘आंतराष्ट्रीय न्याय दिवस’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि स्वामी विवेकानंद ब.शि.प्र.मं. संचलित माध्यमिक विद्यालय चाळीसगाव , ता. चाळीसगाव, जि. जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले.

सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन केले. सदर शिबीरात श्री. दिवाकर अभिमान पाटील, शिक्षक, स्वामी विवेकानंद ब.शि.प्र.मं.संचलित माध्यमिक विद्यालय यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना केली. श्री.रमेश सुधाकर पोतदार, शिघ्रकवी, समांतर विधी सहाय्यक तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी ‘आंतरराष्ट्रीय न्याय दिवस आणि बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर काव्य सादर केले.

श्री.सचिनकुमार भुपेंद्र दायमा, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी ‘पाॅस्काे कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना बालक व प्रौढ नागरिक याबद्दल समजावुन सांगितले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘आंतराष्ट्रीय न्याय दिवस’ ‘बालकांचे अधिकार’ तसेच मुलांचे भविष्य कसे उज्वल करता येईल’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून आजचा विद्यार्थी हा उद्याचे भविष्य आहे याबद्दल मार्गदर्शन केले. सदर शिबीरात शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के. पवार,वरिष्ठ लिपीक, श्री.डी.टी.कु-हाडे, क.लिपीक व श्री. तुषार अनिल भावसार, शिपाई यांनी पाहिले. श्री.मधुकर रविंद्रनाथ जावळे, मुख्याध्यापक, स्वामी विवेकानंद ब.शि.प्र.मं.संचलित माध्यमिक विद्यालय यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

हे पण वाचा

टीम झुंजार