Viral Video : रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा दरोडा पडल्याच्या घटना जगभरातून समोर येतात. यात गुन्हेगार दागिने घाललेल्या महिला आणि पैसे घेऊन प्रवास करणाऱ्या लोकांना लक्ष्य करतात. त्यांच्याकडून सर्व मौल्यवान वस्तू आणि रोकड काढून घेतात.
यावेळी दरोडेखोर कधी शस्त्रांचा वापर करतात तर कधी जीवे मारण्याची धमकी देतात. चोर किंवा दरोडेखोर काही सेकंदात चोरी करुन पसार होतात अशावेळी त्यांना पकडणे अवघड असते.
पण तुम्ही कधी पाहिलं आहे का, चोराने एखादी मौल्यवान वस्तू चोरली आणि ती मन बदलल्यानंतर काही क्षणात परत केली, नाही ना. पण अशाप्रकारच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन दरोडेखोरांनी एका तरुणीच्या हातातील मौल्यवान बॅग खेचून नेण्याचा प्रयत्न केला पण तिच्यासोबत असलेला तिचा बॉयफ्रेंड घाबरून पळून गेल्याने चोरांना दया आली आणि त्यांनी तिची बॅग लगेच परत केली.
लुटण्यासाठी आलेल्या चोरांना पाहून गर्लफ्रेंडला एकटीला सोडून प्रियकर पसार…….
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गर्लफ्रेंड आणि तिचा बॉयफ्रेंड रस्त्यावरून चालताना दिसत आहे. यावेळी मागून दोन चोरटे दुचाकीवरून आले आणि त्या दोघांच्या जवळ येत त्यांना धमकावून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरांना पाहून घाबरतो बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला एकटीला सोडून पळून जातो. बिचारी गर्लफ्रेंड देखील त्याच्यामागून पळून जाण्याचा
प्रयत्न करते, मात्र बाईकवरुन आलेले चोर तिच्या जवळ येतात आणि तिच्या हातातील बॅग हिसकावून घेतात. घाबरलेली गर्लफ्रेंड देखील चोरांना काही करण्याच्या आत आपल्या हातातील बॅग चोराला देऊन टाकते आणि पळून गेलेल्या बॉयफ्रेंडकडे बघत राहते.
बॉयफ्रेंडचा हा घाबरटपणा पाहून चोरही आश्चर्यचकित होतात, यानंतर ते हावभावावरून तरुणीशी काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान चोरांच्या मनात काय येते माहित नाही पण ते तरुणीची बॅग तिला परत करतात.
कॅप्टन गरुफा नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही घटना जवळच्या इमारतीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओवर आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, कारण एखाद्या चोराने आपल्या जवळच्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा किंवा तिच्याजवळील वस्तू खेचून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला आपण वाचवण्याचा प्रयत्न करुन मात्र व्हिडीओमधील तरुण आपल्यासोबतच्या तरुणीला एकटीला सोडून पसार झाला.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.