मालेगाव :- गुप्तधनाच्या लालसेपोटी 9 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचं अपहरण करून नरबळी दिल्याच्या आरोपावरून बापलेक, मेहुणा आणि भोंदुबाबा यांना अटक करण्यात आली आहे.यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. गेल्या आठवड्यात रविवारी १६ जुलै रोजी कृष्णा सोनवणे हा ९ वर्षाचा मुलगा शेतात जातो म्हणून घरातून गेला होता. त्यानंतर दिवसभर तो घरी परतला नाही आणि बेपत्ता झाला होता. दोन दिवसांनी १८ जुलै रोजी त्याचा मृतेदह पोहाणे गावच्या शिवारात आढळला होता.
गळा चिरलेल्या आणि मातीच्या ढिगाऱ्यात पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं नरबळीची शंका व्यक्त केली जात होती.कृष्णा शेतात गेल्यानंतर तो सायंकाळपर्यंत घरी परतला नव्हता. शोध घेऊनही तो न सापडल्याने वडिलांनी पोलिसात धाव घेत मुलगा पळवून नेल्याची किंवा त्याचं अपहरण झाल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी कृष्णाचा शोध सुरू केला.
दरम्यान, वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील विहिरीजवळ जमिनीत पुरलेल्या अवस्थेत कृष्णाचा मृतदेह आढळला. त्याचा गळा कापण्यात आला होता. वन विभागाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. कृष्णाचा मृतदेह आढळल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या गळ्यावर कापल्याच्या खुणा असल्याने नरबळीचा संशय व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून नरबळी प्रकरणी भोंदुबाबासह चौघांना अटक केलीय.
हे पण वाचा
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.
- धुमधडाक्यात आली वरात, डी जे वाजवण्यावरून झाला वाद, लग्नाचा आनंद क्षणात दुःखाच्या सागरात बुडाला, लग्नात असं काय घडलं?