चौथ्या लग्नाच्या वेळी,आधुनिक बंटी-बबलीला पोलिसांनी अटक केली,काय भांनगड आहे सविस्तर वाचा.
जयपूर : लग्न केल्यावर फसवणूक करून पैसे आणि दागिने घेऊन जाणाऱ्या पळून जाणाऱ्या वधूंबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. असे अनेक किस्से कानावर पडतात. पण राजस्थान मध्ये पोलिसांनी अशा एका नववधूला अटक केली आहे, जिचं लग्न स्वत: तिचा पतीचलावून देत होता.आत्तपर्यंत त्या महिलेने तीन लग्न करून फसवणूक केली आहे. चौथ्या वेळी मात्र ती पकडली गेली आणि तिचा खेळ खल्लास झाला.
पैशांच्या लोभापायीच तिचा पती आपल्या पत्नीची लग्न लावून देत असे आणि काही दिवसानंतर ती सासरच्या घरातील पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन पहिल्याच पळून जात असे आणि नंतर दोघेही मिळून नवीन बकरा शोधत. मात्र राजस्थानमध्ये त्यांचा हा प्लान फसला आणि अखेर या आधुनिक बंटी-बबलीला पोलिसांनी अटक केली.
नक्की काय झालं ?…
हे प्रकरण अलवरच्या बन्सूरचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील एक व्यक्ती आपल्या पत्नीला अविवाहित दाखवून तिचे लग्न लावून द्यायचा. त्यानंतर संधी पाहून १५ दिवसांनी तो तिला घेऊन पळून जायचा. ती घरातील पैसे आणि दागिने लुटून घेऊन जायची.
३ जून रोजी झाला होता हरिमोहनशी विवाह…
या धूर्त जोडप्याने आतापर्यंत तीन लोकांना फसवून लग्ने केले होते आणि नंतर तेथून पैशासंकट ते फरार झाले. मात्र चौथ्या लग्नाच्या वेळी मात्र ते स्वत:च्याच जाळ्यात अडकले आणि पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले. अलवरमधील बन्सूर येथील मीना मोहल्ला येथे राहणारे ३६ वर्षीय हरिमोहन मीना यांचे लग्न आसाममधील मधुनी येथील दीप्ती नाथ हिच्याशी झाले. ३ जून रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मुलीच्या पालकांच्या सांगण्यावरून लग्नात सर्व विधी पार पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या लग्नात सुमारे ८ लाख रुपये खर्च झाले. वधूच्या नावाने चार लाख रुपये आसाममधील लोयाकलिता येथील बलेता नलबारी यांनाही देण्यात आले होते.
मात्र लग्नानंतर 15 दिवसांनी दीप्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, असे हरिमोहन यांनी सांगितले. मला याबाबतत अनेकवेळा शंकाही आली, असे त्याने नमूद केले.
अखेर कसे पकडले ?
21 जून रोजी दुपारी त्यांच्या घराबाहेर एक कार आली आणि चालकाने हॉर्न वाजवला. इशारा मिळताच दीप्ती घरातून पळाली आणि जाऊन गाडीत बसली.
मात्र हे पाहून हरिमोहन याच्या मोठ्या भावाला शंका आली आणि तो घरातून बाहेर पडला. दीप्ती पळून जाणार असल्याचे त्याच्या लक्षात आले, आणि त्यांनी सर्वांना हाका मारून गोळा केले. तेव्हा घरातील सर्वजण बाहेर आणि कारला घेरावर घालून उभे राहिले. त्यानंतर दिप्ती आणि तिचा पती लॉयकलिता यांना पकडण्यात आले. कुटुंबीयांनी त्या दोघांनाही पोलिसांकडे नेले. दिप्ती ही पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळून जाणार होती, असे हरिमोहनने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिची तपासणी केली असता दिप्तीने आपले लग्न आधीच झाल्याचे आणि आपल्याला दोन मुलं असल्याचे कबूल केले. लॉयकलिचा हाच तिचा पती असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी त्याला खडसावले असता त्याने सगळं हरिमोहन आणि त्याच्या कुटुंबियांवर ढकलून दिलं. हरिमोहनने आपल्या पत्नीला फसवूनयेथे आणल्याचा आरोप त्याने लावला.
मात्र पोलिसा खाक्या दाखवताच लॉयकलिता हाच दिप्तीचा पती असून त्यानेच तिचं दुसरं लग्न लावून दिल्याचं समोर आलं. या लोकांची गँग असल्याचा पोलिसांना संशय असून इतरांचा शोध घेतला जात आहे. लॉकलिताने आत्तापर्यंत दिप्तीचं चार वेळा खोटं लग्न लावून दिलं असून ती त्यांना फसवून पैसे घेऊन पळून गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून सध्या दोघांची चौकशी सुरू आहे.