स्वातंत्र्यदिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत आहे असे चिठ्ठीत लिहून दलित मित्र डॉ.व्ही.आर.पाटील यांची आत्महत्या.

Spread the love

मृतदेह अमळनेर तालुक्यात तरंगतांना आढळुन आला, पाळधी येथे रात्री शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार.
पाळधी :- तालुका धरणगाव येथील रहिवाशी महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार प्राप्त डॉ.विश्वनाथ रतन पाटील वय 80 यांनी चोपडा तालुक्यातील निमगव्हाण नजीक तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील डॉ. व्ही आर पाटील स्वातंत्र्यदिनी सकाळी चार चाकी गाडी घेऊन निमगव्हाण येथील तापी नदीच्या पुलावर गाडी लावून गाडीच्या बोनेटवर आत्महत्येची चिठ्ठी लिहिली त्यात आपण स्वातंत्र्यदिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे.

जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली त्यामुळे आता जीवन चांगल्या प्रकारे जगल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे चिट्ठीवर नाव आणि मोबाईल नंबर टाकून त्यावर दगड ठेवून पायातील बूट काढून नदीत त्यांनी उडी घेतल्याचे निमगव्हाण येथील काहींनी बघितले असल्याचे सूत्रांकडून समजते क्षणात घडलेली घटना बघितल्यानंतर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी त्वरित दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधून कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यांचा वाहून गेलेला मृतदेह मांजरोद शिवारात आढळून आला

अमळनेर येथे उत्तरीय तपासणी करून रात्री साडेदहाला शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर पाळधी येथे शेकडोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. पाटील यांनी पाळधी येथे श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना करून अनेक रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन कांताई रुग्णालयात केले तसेच श्री संत तुकाराम मराठा समाज मंडळाची देखील त्यांनी मोट बांधून तुकाराम बीज दरवर्षी साजरी केली त्यांनी पुरोगामी विचारसरणीचे काही पुस्तके ही लिहिली होती

त्यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाळ सोनवणे समता परिषदेचे भूषण महाजन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे.

https://www.youtube.com/@zunjaarnews

Like share and Subscribe our youtube Channel

आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????

हे पण वाचा

टीम झुंजार