मेहकर:- शेतातील पीक पाहण्यासाठी गेलेल्या 37 वर्षीय एका शिक्षकांच मधमाशांच्या केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सोनाटी येथे 23 नोव्हेंबर रोजी रोजी घडली. या घटनांमुळे या परिसरात शोकाकळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सोनाटी येथे राहत असलेले व हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील अप्पा स्वामी विद्यालय येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक प्रमोद दत्तात्रय बदर हे आपल्या आई सोबत गुरुवारी शेतात पीक पाहण्यासाठी गेले होते.
दरम्यान तुरीच्या शेतात झाडावर काही माकडे बसलेली होती म्हणून सदर शिक्षकांनी दगड मारून माकडांना पळविले त्याचवेळी माकडाने फांदीवर उडी मारली त्या ठिकाणी मोहळ लागलेले होते मोहळ खाली असलेल्या शिक्षकांच्या अंगावर पडल्याने अख्खे मोहळ शिक्षकांच्या अंगावर पडले त्यामुळे असंख्य Bee attack मधमाशांनी चावा घेतल्यामुळे शिक्षक प्रमोद बदल यांच्या दुर्दैवी अंत झाला.
हे पण वाचा
- सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर जुळले दोघांचे प्रेम; विवाहित असूनही सोबत राहण्याच्या घेतला निर्णय,पण चिमुकल्यासह दोघांची रेल्वेखाली उडी घेऊन संपविले जीवन.
- २० वर्षांपूर्वी झाले लग्न,१८ अन् १६ वर्षाची दोन मुले असलेल्या कुटुंबात झाला कलह पत्नीने गळफास घेऊन अन् दुसऱ्याच दिवशी पतीनेही रेल्वेसमोर उडी घेऊन संपविले जीवन.
- जळगाव शहरातून चोरी झालेली महागडी कार पोलीस उपनिरीक्षक व सहकाऱ्यांनी राजस्थानातून केली हस्तगत.
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.