दुदैवी घटना! शेतातील पीक पाहण्यासाठी गेलेल्या 37 वर्षीय शिक्षकावर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू

Spread the love

मेहकर:- शेतातील पीक पाहण्यासाठी गेलेल्या 37 वर्षीय एका शिक्षकांच मधमाशांच्या केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सोनाटी येथे 23 नोव्हेंबर रोजी रोजी घडली. या घटनांमुळे या परिसरात शोकाकळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सोनाटी येथे राहत असलेले व हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील अप्पा स्वामी विद्यालय येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक प्रमोद दत्तात्रय बदर हे आपल्या आई सोबत गुरुवारी शेतात पीक पाहण्यासाठी गेले होते.

दरम्यान तुरीच्या शेतात झाडावर काही माकडे बसलेली होती म्हणून सदर शिक्षकांनी दगड मारून माकडांना पळविले त्याचवेळी माकडाने फांदीवर उडी मारली त्या ठिकाणी मोहळ लागलेले होते मोहळ खाली असलेल्या शिक्षकांच्या अंगावर पडल्याने अख्खे मोहळ शिक्षकांच्या अंगावर पडले त्यामुळे असंख्य Bee attack मधमाशांनी चावा घेतल्यामुळे शिक्षक प्रमोद बदल यांच्या दुर्दैवी अंत झाला.

हे पण वाचा

टीम झुंजार