कौशंबी (उत्तर प्रदेश) :- जिल्ह्यात बलात्कार पीडितेच्या हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांना चकमकीनंतर अटक केली आहे. चकमकीदरम्यान गोळी लागल्याने आरोपी जखमी झाला. तर इतर आरोपी अंधाराचा फायदा उचलत घटनास्थळावरुन पळून गेले.पोलीस त्यांना अटक करण्यासाठी जागोजागी शोध घेत आहे. पोलिसांना जखमी आरोपीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
पीडित मुलगी बलात्काराची तक्रार मागे घेत तडजोड करण्यास नकार देत असल्याने आरोपीने आपल्या भावासह मिळून तिची हत्या केली होती. महत्त्वाचं म्हणजे, आरोपी 15 दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता. यानंतर तो सतत पीडितेच्या कुटुंबावर तडजोड करण्यासाठी दबाव टाकत होता. मुलीने नकार दिल्यानंतर त्याने शिव्या घालत जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलगी आपल्या वहिनीसह पोलीस ठाण्यातून परतत असताना आरोपी पवन आणि त्याचा भाऊ अशोक आणि इतर सहकाऱ्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. यानंतर त्यांनी पीडितेवर तिच्या वहिनीसमोर कुऱ्हाडीने वार केले होते. यावेळी गावकरी फक्त उभे राहून पाहत होते. हत्येनंतर आरोपी घराला टाळं लावून फरार झाले होते. आरोपीवर 25 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
पोलिसांनी चकमकीनंतर 48 तासांत मुख्य आरोपीला अटक केली. हत्येत सहभागी तीन आरोपी सध्या फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महेवाघाट पोलीस ठाणे क्षेत्राच्या रामनगर यमुना कछार येथे ही चकमक झाली. पोलिसांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाली होती की, सोमवारी 20 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करणारे आरोपी रामनगरच्या कछार परिसरात लपले असून नदी पार करत मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी महेघावाट पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ सोबत घेत कछार परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं.
यावेळी पोलीस आणि एसओजीने आरोपींना घेरलं. पोलिसांच्या जाळ्यात आपण अडकत असल्याचं लक्षात येताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर दिलं. यावेळी आरोपी अशोक निषाद याच्या दोन्ही पायांना गोळी लागली आणि गंभीर जखमी झाला. पोलिसांनी यावेळी तिचा सहकारी गुलाबचंदला अटक केली. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहे.
बलात्कार प्रकरणी आरोपी तडजोड करण्यासाठी दबाव टाकत होते. जेव्हा पीडितेने तडजोड करण्यास नकार दिला तेव्हा अशोक, पवन, प्रभू आणि लोकचंद्र यांनी भरदिवसा तिला रस्त्यावर पकडलं. यावेळी त्यांनी कुऱ्हाडीने पीडितेच्या डोक्यावर तीन आणि मानेवर एक वार केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते. पीडितेच्या वहिनीने तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई सुरु करण्यात आली होती.
हे पण वाचा
- Viral Video :”तू माझ्या आईला शिवीगाळ कशी काय करू शकतेस?” एकमेकींच्या झिंज्या उपटत दोन महिलांमध्ये तुफान राडा पहा व्हिडिओ.
- अपूर्ण अवस्थेतील घरकुल योजना पूर्ण करून बेघरवासीयांना घरकुले मिळून द्यावीत; एरंडोल येथील घरकुलांचे भिजत घोंगडे सोडण्याची आमदार अमोलदादा पाटील यांच्याकडे मागणी.
- घरगुती गॅस सिलिंडर मधून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरणाऱ्या टोळीवर अमळनेर पोलिसांच्या छापा, 38 गॅस सिलिंडर जप्त, चौघांना अटक.
- जळगाव एलसीबीच्या पथकाने बाहेर जिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; चार दुचाकी जप्त.
- Viral Video: गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गुरुजींचा घृणास्पद प्रकार विद्यार्थ्यांना चक्क….. पहा संतापजनक व्हिडिओ.