केंद्र व राज्यसरकारच्या योजनांची माहिती घराघरात पोहोचवा.-ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, एरंडोलला भाजप पदाधिका-यांची बैठक.

Spread the love

एरंडोल :- केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि बारा बलुतेदार समाज यांच्यासाठी सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचवावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी केले.भाजपच्यावतीने कमल लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी सर्व पदाधिका-यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिक,बारा बलुतेदार समाज,शेतकरी,कामगार यांच्यासाठी विविध योजना सुरु केल्या असून त्याची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य पदाधिका-यांनी करावे असे आवाहन केले.विश्वकर्मा योजना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त सुरु करण्यात आलेला सेवा पंधरवाडा,मेरा बूथ सबसे मजबूत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रम,बूथ सशक्तीकरण अभियान आदी कार्याक्रमांबात जनजागृती करून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे सांगितले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले.आगामी काळात राष्ट्रीय व राज्यस्तरीय आयोजित करण्यात येणा-या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले..तालुकाध्यक्ष तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.ज्ञानेश्वर कंखरे यांनी सुत्रसंचलन केले.विवेक ठाकूर यांनी आभार मानले. बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी,जिल्हा सरचिटणीस निलेश परदेशी,माजी उपनगराध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,

अँड.नितीन महाजन, अँड.मधुकर देशमुख,संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सुनील (भय्या) पाटील,डॉ.नरेंद्र पाटील, उद्योग आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन विसपुते, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पिंटू
राजपूत,ज्ञानेश्वर कंखरे,संतोष वंजारी,सुरेश वंजारी,भूषण बडगुजर,विवेक ठाकूर,अमर राजपूत,गुलाब पाटील,नाना महाजन,मयूर मयूर ठाकूर,प्रशांत महाजन,सत्यम परदेशी,कल्पेश महाजन,मोहित परदेशी,लोकेश महाले यांचेसह पदाधिकारी,कार्यकर्ते,बूथप्रमुख,विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्य संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार