उत्तरकाशी :- सिल्कियारा बोगद्यात सुरू असलेले बचावकार्य पूर्ण झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी बचाव पथकाला मोठे यश मिळाले असून बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कामगार बाहेर येताच मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.
यानंतर, कामगारांना चहा प्यायला देण्यात आला आणि त्यांना बोगद्यातच बांधलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांची प्राथमिक तपासणी केली. यानंतर, कामगारांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टर 48 ते 72 तास त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवतील. एनडीआरएफची टीम स्ट्रेचरच्या मदतीने पाईपमधून बोगद्याच्या आत गेली, त्यानंतर एकामागून एक कामगारांना बाहेर काढण्यात आले. यावेळी सीएम धामी यांनी ट्विट करून संयम, मेहनत आणि विश्वासाचा विजय झाल्याचे म्हटले आहे.
रॅट मायनिंगच्या माध्यमातून कामगारांपर्यंत पोहोचली टीम…..
कामगारांच्या बचाव कार्यात गुंतलेले अमेरिकन ऑगर मशीन 48 मीटर ड्रिल केल्यानंतर तुटले आणि बोगद्यात अडकले. तर कामगार 60 मीटरवर अडकून पडले होते. यानंतर, पारंपारिक रॅट होल मायनिंग तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला, सोबत उभे ड्रिलिंग देखील सुरू करण्यात आले. रॅट मायनिंगच्याकामासाठी, हाताने ड्रिलिंग करत असताना तज्ज्ञांची एक टीम कामगारांपर्यंत पोहोचली आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी पाईप टाकण्यात आले.
आधी २ रुग्णांना बाहेर काढलं; बांधकामाच्या ठिकाणी आरोग्य तपासणी…..
गेल्या १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सुरुवातीला दोन कामगांरांना बाहेर काढण्यात आले आणि नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या कामरांना तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते रुग्णालय तयार ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी त्या कामगारांची तपासणी करण्यात येणार आहे. या ठिकाणापासून मेन रुग्णालय ३० किलोमीटर दूर आहे. येथे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहीका तयार ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या बोगद्यातून ४१ कामगारांना बाहेर काढले आहे.
48 ते 72 तास कर्मचारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बोगद्यात 17 दिवस अडकलेल्या कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल. बोगद्यातून बाहेर येताच त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यासाठी बोगद्यातच तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात आले असून, त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवले जाईल. कामगारांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही अगोदर बोलविण्यात आल्या आहेत. या मजुरांना ४८ ते ७२ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही कामगाराला अधिक उपचारांची गरज भासल्यास त्याला एअरलिफ्टने एम्स ऋषिकेश येथे नेण्याची तयारीही करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.