नवी दिल्ली :- ग्रेटर नोएडामध्ये 5 कोटींचे सोने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली येथून ज्वेलरी मालक दागिने घेऊन जात असताना एक्स्प्रेसवेवेर जेवणासाठी थांबले होते. दरम्यान त्यांच्या मागून आलेल्या चोरट्यांनी त्यांची कार चोरुन पळून गेले.सुमारे 45 किलोमीटर पुढे जाऊन त्यांनी कार सोडून सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग पळवली. ज्वेलरी मालकाच्या माहितीनुसार, बॅगेत सुमारे पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने भरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना यमुना एक्सप्रेस वेवर जेवारजवळ घडली आहे. शनिवारी रात्री जौनपूर येथील एका ज्वेलरी शॉपचे मालक विवेक आणि मुनीश हे चांदणी चौकातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने खरेदी करुन घरी जात होते. त्यांच्या बॅगेत जवळपास 5 कोटी रुपयांचे दागिने असल्याचे त्यांनी सांगितले. ते यमुना एक्स्प्रेस वेवर शिवढाबा येथे जेवणासाठी थांबले. मात्र एवढी मोठी रक्कम असल्याने त्यांनी ती बॅग गाडीतच ठेवली आणि जेवायला गेले. जेवून परतल्यानंतर त्यांची कार पार्किंगमध्ये दिसली नाही आणि त्यांच्या पायाखालची जमिन सरकली.
त्यांनी तत्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली. या बॅगमध्ये नेमके किती दागिने होते याबाबत ज्वेलरी दुकानाच्या मालकाकडून माहिती मिळालेली नाही. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांची इनोव्हा गाडी त्या ढाब्यापासून 44 किमी अंतरावर आढळली. गाडीची तपासणी केली असता गाडीत बॅग नव्हती. चोरटे कार सोडून बॅग घेऊन पळून गेले होते. पोलिसांनी सांगितले की, हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत असल्याने जवळच्या लोकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या घटनेची तक्रार जेवर पोलीस ठाण्यात केली आहे. या संपूर्ण घटनेचा प्रत्येक पैलू विचारात घेऊन सखोल तपास करण्यात येत असल्याचे जेवर पोलीस ठाण्याचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे.
हे पण वाचा
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.
- पारोळा तालुक्यात व्यापारी दाजीने मेहुण्याची ५३ लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याच्या केला खून अन् अपघाताच्या केला बनाव पण…….
- ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये मग केलं लग्न, पत्नीला लागली सरकारी नोकरी अन् तिची सटकली इंजिनिअर नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.
- पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास; १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयाचा निर्णय.
- गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला मी शोधण्यास मदत करेल तू आधी माझ्याशी संबंध ठेव पोलिसांने केली महिलेकडे मागणी.