Viral Video:एक लग्न असेही! नवरा नवरीने बांधली रूग्णालयात लग्नगाठ; कारण ऐकून थक्क व्हाल पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट असते. यादरम्यान साखरपुडा, हळद, लग्न आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच या कार्यक्रमांना आणखीन कसे खास करता येईल, याकडे प्रत्येकाचे लक्ष असते. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका जोडप्याने चक्क हॉस्पिटलमध्ये लग्न केलं आहे.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील आहे. २७ वर्षीय अविनाश कुमार हा पूर्व दिल्लीचा रहिवासी आहे. लग्नापूर्वी त्याला डेंग्यू हा आजार झाला. यानंतर त्याला वैशाली येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच लग्नाच्या तारखेपर्यंत अविनाश याची तब्येत सुधारली नव्हती. पण, लग्नाची तारीख आधीच ठरली असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाशी बोलून रुग्णालयातच त्याचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर रुग्णालय तुम्हाला एका लग्न मंडपासारखे सजवण्यात आलेले सुद्धा दिसेल. तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरा आणि नवरी लग्नासाठी खास तयार झाले आहेत. तसेच हॉस्पिटलसुद्धा लग्न मंडपासारखे सजवण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये जोडीदार एकमेकांना हार घालताना दिसत आहेत आणि दोघांच्या कुटुंबातील सदस्य गुलाबाच्या पाकळ्यांचा त्यांच्यावर वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच यादरम्यान एक फोटोग्राफरदेखील बोलावण्यात आला आहे आणि हॉस्पिटलमध्ये हे अनोखं लग्न करण्यात आले आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणाच्या हातावर काही पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Benarasiyaa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या अनोख्या लग्नाची खास माहिती लिहिण्यात आली आहे आणि सोशल मीडियावर या व्हिडीओने आणि या अनोख्या लग्नाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार