धरणगाव :- तालुक्याच्या मयुरेश पाटील याने राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी (NDA) खडकवासला पुणे, येथून नुकतेच नौदल अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले. दि.३० नोहेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी (NDA) ची १४५ व्या बॅच ची पासिंग आउट परेड संपन्न झाली. या परेड ची मानवंदना स्वीकारण्यासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू स्वतः उपस्थित होत्या, तसेच भारताचे चीप ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल श्री. अनिल चव्हाण हे देखील या सोहळ्यात उपस्थित होते.
खडकवासला पुणे येथील राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी (NDA) भारतातील एकमेव संस्था असून जी, तिन्ही सेना दलातील अधिकारी घडविण्याचे काम करते. राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी (NDA) आशिया खंडातील सर्वात मोठी रक्षा संस्था असून, १४५ बॅच मधून देश विदेशातील सुमारे ३५३ कॅडेट्स नी आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशाच्या सेवेत हजर झालेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव मयुरेश पाटील याचा समावेश असून, त्याने जिल्ह्याला नौदलात वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळवून दिला.
मयुरेश धरणगाव तालुक्त्यातील मौजे वंजारी खपाट चे माजी सरपंच डॉ. दीपक पाटील व सौ शीतल पाटील यांचा मुलगा असून त्याने १० वी पर्यंतचे शिक्षण जळगाव येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मधून २०१८ साली पूर्ण केले, व १२ वी पर्यंत चे शिक्षण डिफेन्स करिअर अकॅडेमी छ. संभाजी नगर येथून पूर्ण केले, याच काळात UPSC- NDA २०२० ची परीक्षा उत्तीर्ण केली डिसेंबर २०२० मध्ये विशाखापट्टण येथे पाच दिवसीय ssBमुलखात यशस्वी रित्या पास होवून २०२१ मध्ये NDAच्या १४५ व्या बॅच साठी दाखला मिळविला.
पुढील एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी तो आता केरळ येथील भारतीय नौदल अकादमी (INA) येथे रुजू होणार आहे. मयुरेश चे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. NDAसारखी संस्था महाराष्ट्रात असून महाराष्ट्रीय तरुणांचा टक्का या संथेत खूप कमी असून महाराष्ट्रीय तरुणांनी या प्रतिष्ठीत संस्थेत दाखला मिळविण्यासाठी मेहनत घ्यावी अशी इछा या वेळी मयुरेशने व्यक्त केली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.