एरंडोल :- शासकीय अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात समन्वय असल्यास सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र असलेल्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत
पोहोचण्यास मदत होते असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.नविन बसस्थानकासमोर सुरु करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.आमदार चिमणराव पाटील व पारोळ्याच्या माजी नगराध्यक्षा नलिनी पाटील यांच्याहस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी संपर्क कार्यालयामुळे तालुक्यातील नागरिकांच्या समस्या लवकर सुटतील असा विश्वास व्यक्त केला. संघटना बळकट असेल तर सर्व समस्या सुटू शकतात असे सांगितले.संपर्क कार्यालयात समस्या नेल्यास त्या शंभर टक्के सुटतील असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमध्ये पदाधिका-यांनी निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले.संघटनेच्या माध्यमातूनच आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश प्राप्त करून ताब्यात घेणार असल्याचे सांगितले.
सद्यस्थितीत मतदारसंघात सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरु असून विकासाचा रथ अशाच पद्धतीने वेगात सुरु राहणार असल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी,शेतमजूर, महिला,दलित अदिवासी यांचेसाठी विविध योजना असून त्याची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पदाधिका-यांची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.
युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील यांनी प्रास्ताविक केले.शिवसेनेचे तालुकाप्रमुख
रवींद्र जाधव यांनी सुत्रसंचलन केले.शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत) यांनी आभार मानले.यावेळी शिवसेनेत प्रवेश करणा-या पदाधिका-यांचे आमदार चिमणराव
पाटील यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.भाजपचे जिल्हासचिव निलेश परदेशी,शहराध्यक्ष नितीन महाजन, पिंटू राजपूत,सचिन विसपुते यांचेसह पदाधिका-यांनी आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दयाराम भोसले,युवा उद्योजक संजय काबरा,जिल्हापरिषदेचे माजी डॉ.दिनकर पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,बाजार समितीचे संचालक किरण पाटील,भाजपचे अशोक चौधरी,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे,
तालुका संघटक संभाजी पाटील,कासोद्याचे सरपंच बंटी चौधरी,माजी सरपंच महेश पांडे,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन,गबाजी पाटील,दुध संघाचे संचालक दगडू चौधरी,युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील,शहर संघटक मयूर महाजन,पारोळ्याचे युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील,शहरप्रमुख भूषण भोई,जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ.सत्सिः
देवकर,प्रवराज पाटील,प्रशांत पाटील, अंग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी,शेतकी संघाचे उपाध्यक्ष संभाजी चव्हाण यांचेसह
पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध स्पर्धांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागण्यांचे निवेदन आमदार चिमणराव पाटील यांना दिले.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.