लखनौ (उत्तर प्रदेश): एका डॉक्टरने पत्नी, मुलगी आणि मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांचा खून केला. यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रायबरेली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर अरुण सिंह या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता, मात्र काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

डॉ. अरुण सिंह मॉडर्न रेल कोच फॅक्टरीत डोळ्यांचे डॉक्टर होते आणि ते सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होते. त्यांचा मृतदेह शासकीय निवासस्थानात फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बेडवर पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. डॉक्टरने मुलगा, मुलगी आणि पत्नीला ज्या हातोड्याने मारलं तोही जवळच सापडला. पोलिसांनी हातोडा ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. डॉ.अरुण यांनी प्रथम पत्नी आणि दोन्ही मुलांना नशेचे औषध दिले होते.
तिघेही बेशुद्ध होताच डॉक्टरने आधी आपल्या चार वर्षाच्या मुलाला हातोड्याने मारून ठार केले. यानंतर 11 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. हा हल्ला इतका जोरदार होता की एकाच वारात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी डॉक्टरने पत्नीची हत्या करून त्याच खोलीत गळफास घेतला.डॉक्टरच्या शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली आहे. यावेळी या कुटुंबातील कोणीही गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर कोणाशीही संपर्क साधला नसल्याचे समोर आले. मंगळवारी रेल्वे कोच फॅक्टरीच्या एका कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने त्यांच्या घरात डोकावून पाहिल्यानंतर आतील दृश्य पाहून पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटना उघडकीस आली. हत्या आणि आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.