एरंडोल :- नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्यापुरवणी अर्थसंकल्पात एरंडोल मतदार संघातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठीसुमारे ४० कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदारचिमणराव पाटील यांनी दिली.मंजूर झालेल्या निधीतून मतदारसंघात रस्ते आणिपुलांचे कामे करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूरहोईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून यामध्ये सादरकरण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात मतदारसंघातील रस्ते आणि पुलांसाठीभरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये
पारोळा तालुक्यातील: देवगावजवळ पुलाच्या बांधकामासाठी ९८ लाख ३५ हजार रुअप्येमंजूर करण्यात आले आहेत. तसेच अमळनेर नाका ते शनी मंदिरापर्यंतरस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी तीन कोटी रुपये,शिरसमणी ते तालुकाहद्दीपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये,पारोळा ते पुनगावरस्त्याच्या पुलासह दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये,कान्हेरे ते सावखेडारस्ता दुरुस्ती तीन कोटी रुपये,भोन्दन ते चोरवड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी१ कोटी ५० लाख रुपये,मुंदाणे प्र.अ.ते सोके रस्त्यावरील पुलाच्यादुरुस्तीसह रस्त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
एरंडोल तालुक्यातील: जवखेडे बुद्रुक आणि जवखेडे खुर्द या गावांना जोडणा-या अंजनीनदीवरील पुलाच्या नवीन बांधकामासाठी ५ कोटी ६० लाख रुपये,राष्ट्रीयमहामार्ग ते सावदा रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ८० लाख रुपये,राष्ट्रीयमहामार्ग ते जवखे रस्ता दुरुस्ती १ कोटी रुपये,फरकांडे ते लोणीरस्त्याच्या कामासाठी १ कोटी ५० लाख रुपये,कासोदा ते जवखेडेसीम रस्तादुरुस्ती ९० लाख रुपये,तळई ते अंतुर्ली रस्त्यावरील पुलाच्याबांधकामासाठी १ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
भडगाव तालुक्यातील: गिरड गावातून जाणा-या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटीरुपये,भातखंडे गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ५० लाख रुपये, पिंपरखेड आंचळगाव रस्त्यावर नवीन पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ५०लाख रुपये अशा मतदारसंघातील पूल आणि रस्त्यांच्या कामांसाठी ४० कोटी ४८लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनीसांगितले.सद्यस्थितीत मतदार संघात सुमारे पंधराशे कोटी रुपयांचीविकासकामे सुरु असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत,आगामी काळात देखीलमतदारसंघातील विकासाची घौडदौड अशीच वेगाने सुरु राहील असा विश्वासत्यांनी व्यक्त केला.जवखेडे खुर्द आणि बुद्रुक या दोन गावातील नागरिकांचीपावसाळ्यात मोठी गैरसोय होत होती.पावसाळ्यात अंजनी नदीला पाणी आल्यास यादोन्ही गावांचा संपर्क तुटत होता.अंजनी नदीवरील पुलाच्या कामामुळे दोन्हीगावातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
पुरवणी अर्थसंकल्पात पारोळा तालुक्यासाठी १९ कोटी ४८ लाख ३५ हजार रुपये,एरंडोल तालुक्यासाठी सुमारे तेरा कोटी रुपये,तर भडगाव तालुक्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांच्यारस्ते आणि पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.यापूर्वी देखील एरंडोलशहरातील गांधीपुरा आणि शहर यांना जोडणा-या अंजनी नदीवर सुमारे चार कोटीरुपये खर्च करून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून लवकरच पुलाचेलोकार्पण करण्यात येणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. तसेच एरंडोल आणि पारोळा शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम देखील वेगात सुरु असल्यामुळे भविष्यातील पाण्याचीसमस्या कायमस्वरूपी दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा
- धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा…. महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार
- जन्मदात्या आईच्या मृतदेह समोरून गेला सरणावर, 8 मुली 1मुलगा पैकी कोणीही अंत्यसंस्कारासाठी तयार होईना, पण जमिनीच्या वाटणीला मात्र…..
- Viral Video: घराच्या छतावर पती पत्नीचे भांडण गेले टोकाला; पत्नीने थेट पतीला छतावरूनच खाली फेकले, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पती होता अनैतिक संबंधात अडसर बायकोने रचला डाव पलंगावर झोपलेल्या नवऱ्यावर वार करून केली हत्या,पोलिसांनी तीन तासात पत्नी व प्रियकराला केली अटक.
- पत्नीच्या आई वडिलांकडून 25 तोळे सोने व 75 लाख रुपये घेऊनही पत्नीस शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तहसिलदार पतीला अटक.