महाराष्ट्रातील दोन चोरट्यांनी कानपूर(यु पी.) जावून तब्बल 16 कोटींचं सोनं स्कुटीवर पळवलं, पोलीसही हैराण.

Spread the love

सांगली, : कानपूर मध्ये गलाई व्यवसायनिमित्त परराज्यात गेलेल्या सांगली जिल्ह्यातील दोघांनी काही गलाई व्यावसायिकाचे तब्बल 16 कोटी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन चोरट्यानी पोबारा केला आहे. दोघेही मुळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. चोरी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत शिवाजी लवटे आणि महेश विलास मस्के असं या संशियतांची नावे असून पोलिसांनी त्यांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.

संपत हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी गावचा आणि महेश हा पलूस तालुक्यातील नागराळे गावचा आहे. सांगली पोलिसांच्या मदतीने सोनं घेऊन पळालेल्या दोघांचा शोध घेतला जात असून अद्याप तरी दोघाचा थांगपत्ता लागला नाही.कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. त्यामुळे सध्या या दोघा संशयिताच्या कुटुंबातील सदस्यांची कानपूर पोलीस आणि स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. सोनं घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दोन तरुण सोन्याने भरलेली पेटी घेऊन दुकानातून बाहेर येतात आणि स्कुटीवर ठेवतात. त्यानंतर दोघेही स्कुटीवर सोनं घेऊन पसार झाले.कानपूर पोलिसांनी याबाबत तपास यंत्रणा लावली असून सांगली जिल्ह्यात याबाबत पोलिसांनी तळ ठोकला आहे. विट्यातूनही याबाबतचा तपास सुरू असून चोरी करणारे संशयित आरोपी हे आरोपी फरार असल्याने कानपूर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात आपली यंत्रणा कामाला लावली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार