अमरावती : शहरात अवैध घातक शस्त्रे विक्री करणार्या 6 जणांच्या टोळीला अटक करून गुन्हे शाखेच्या पथकाने 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू व 2 अग्नीशस्त्र (देशी कट्टे) जप्त केले आहे.कारवाईची माहिती सोमवारी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.आगामी काळात ख्रिसमस तसेच शहरा महाशिवपुराण कथा सारखे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. पुढे लोकसभा निवडणुका आहेत. त्या पृष्ठभूमिवर सदर कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. पोलिस आयुक्तांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकांने विशेष मोहीम राबविण्यात येत होती.

त्याचवेळी पथकाला घातक शस्त्रे विक्री करणार्या टोळीची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी अब्दुल सोहेल अब्दुल शफी (वय 19 वर्ष, रा. गुलीस्ता नगर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे 1 खंजर व 2 चायना चाकू मिळाले. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार टोळी प्रमुख अकरम खान उर्फ गुड्डु वल्द बादुल्ला खान (वय 19 वर्ष, रा. अलीम नगर), टोळी सदस्य फरदीन खान युसुफ खान (वय 21 वर्ष, रा.राहुल नगर), मुजम्मील खान जफर खान (वय 21 वर्ष, रा.गुलीस्ता नगर), शेख सुफियान मोहम्मद अशफाक (वय 19 वर्ष, रा. यास्मीन नगर), जाहेद शहा हमीद शहा (वय 20 वर्ष, रा. लालखडी) असे सहा जणांना अटक करण्यात आली.
टोळीतील सहा आरोपींकडे चौकशी केली असता ते मुंबईवरून शस्त्र आणून शहरातील गुन्हेगारांना पुरवठा करत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. सलग 72 तास सखोल तपास केल्यावर व विविध ठिकाणी छापा मारल्यावर आजपर्यंत 102 खंजर, 2 चायना चाकू व 2 अग्नीशस्त्रे (देशी कट्टे) असा एकूण 1 लाख 85 हजार 500 रूपयाची शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. पो.स्टे.नागपुरी गेट येथे अआर्म अॅक्टच्या विविध कलमान्वये व सहकलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा पोनि. राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सपोनि महेश इंगोले, अनिकेत कासर, पोउपनि राजकिरण येवले, पोलिस अंमलदार राजेंद्र काळे, संजय वानखडे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी तसेच चालक संदिप खंडारे यांनी केली आहे.
आणखी शस्त्रे सापडण्याची शक्यता
अमरावती शहरात भविष्यात होणार्या खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा या सारख्या गंभीर गुन्हयांवर सदर कारवाईनंतर प्रतिबंध घालण्यात यश येणार असल्याचे पेलिसांनी सांगितले. राज्यातील अवैध शस्त्राविरोधाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचा अंदाज आहे. टोळी सदस्यांनी शहरातील शस्त्र बाळगणार्या गुन्हेगांराची माहीती दिली आहे. तपासात आणखी शस्त्रे मिळण्याची दाट शक्यता आहे. बरेच गुन्हेगार शहर सोडून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.
- पारोळा तालुक्यात व्यापारी दाजीने मेहुण्याची ५३ लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याच्या केला खून अन् अपघाताच्या केला बनाव पण…….
- ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये मग केलं लग्न, पत्नीला लागली सरकारी नोकरी अन् तिची सटकली इंजिनिअर नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.
- पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास; १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयाचा निर्णय.
- गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला मी शोधण्यास मदत करेल तू आधी माझ्याशी संबंध ठेव पोलिसांने केली महिलेकडे मागणी.