इंदूर :- अनैतिक संबंध ठेवण्यासाठी सक्ती केल्याने आणि व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केल्याने वैतागलेल्या महिलेने तिच्या पतीसह मिळून एका हॉटेल मालकाची आणि त्याच्या मैत्रिणीची हत्या केली. या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
हॉटेल व्यावसायिक रवी ठाकूर आणि त्याची मैत्रीण सरिता ठाकूर या दोघांचीही धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शनिवारी या दोघांचे मृतदेह सरिता ठाकूरच्या घरी विवस्त्र अवस्थेत आढळले होते. इंदूरमध्ये ही घटना घडली असून अतिरिक्त पोलीस उपायुक्त आलोक कुमार शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
अतिरिक्त पोलीस आयुक्त शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुहेरी हत्याकांड प्रकरणात नितीन पवार आणि त्याची पत्नी ममता पवार या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सरिता ठाकूरने ममता आणि हॉटेल व्यावसायिक रवी ठाकूर यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. या प्रकरणाची माहिती ममताचा पती नितीन पवारला मिळाली. त्यानंतर या संबंधांवरुन दोघांमध्ये कायमच खटके उडू लागले होते.
हत्येचा कट रचला गेला
रवी ठाकूरकडे ममताचे काही प्रायव्हेट व्हिडीओ होते. त्यामुळे तो तिला अनैतिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून ममता आणि तिचा पती नितीन पवार या दोघांनी रवी ठाकूरची हत्या करण्याचा कट रचला.
तलवारीचे वार करुन हत्या
अतिरिक्त पोलीस आयुक्त शर्मा यांनी सांगितलं की ममताने ठरलेल्या कटाप्रमाणे रवी ठाकूरला सरिताच्या घरी भेटायला बोलवलं. त्यानंतर ममता आणि तिचा पती नितीन यांनी आधी सरिताची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर रवी ठाकूर घरी आला तेव्हा त्याच्यावरही धारदार शस्त्राने वार केले आणि त्याला ठार केलं. शर्मा यांनी सांगितलं घटनास्थळावरुन पोलिसांनी तलवार आणि सुरा दोन्ही जप्त केलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !