प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल :- पळासदड (ता. एरंडोल) येथून चोरट्याने घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी करून फरार झालेल्या चोरट्यास पोलिसांनी अटक करून ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. तर त्याचा एक साथीदार फरार झाला आहे. या चोरट्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पळासदड येथील शेतकरी लोटन बाळकृष्ण पटवारी हे २ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता एरंडोल येथे परिवारासह घरी आले होते. लोटन पटवारी यांनी पळासदड येथील घरासमोर ट्रॅक्टर व ट्रॉली उभी केली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता लोटन पटवारी हे पळासदड येथे गायींचे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना घरासमोर लावलेले ट्रॅक्टर व ट्रॉली दिसून आली नाही. त्यांनी ट्रॅक्टरबाबत गावात चौकशी करून गावातील युवकांसह परिसरात शोध घेतला असता त्यांना ट्रॅक्टर आढळून आले नाही. पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश
अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, विकास देशमुख यांचेसह
हवालदार किरण पाटील, अनिल पाटील, संदीप पाटील, अकील मुजावर यांच्यासह पोलिसांनी ट्रॅक्टर चोरीचा तपास करून पळासदड येथीलच रवींद्र राजू ठाकरे या तरुणास ताब्यात घेवून त्याचेकडून चोरीस गेलेले ट्रॅक्टर व ट्रॉली असा सुमारे साडेचार लाखाचा ऐवज जप्त केला. त्याचा एक साथीदार फरार असून पोलीस शोध घेत आहे.
हे पण वाचा
- महावितरणकडून धडक मोहीम,विज बिल कमी यामुळे मीटर चेकिंग मोहीम,७७ वीज ग्राहकांचे मीटर घेतले तपासणीसाठी ताब्यात.
- कांताई धरणाच्या पाण्यातून यंत्राच्या साह्याने भरमसाठ अवैध वाळू उपसा ; ऊपाय योजना करा मागणी.
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.२० जानेवारी २०२५
- एरंडोल बस आगारातर्फे इंधन बचत या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन.
- लग्नानंतर अवघ्या एकाच महिन्यात त्यांच्या संसाराला लागली दृष्ट; पतीचा मृत्यू नंतर विरह सहन न झाल्याने तिसऱ्याच दिवशी पत्नीने संपविले जीवन.