सोलापुर :- एक धक्कादायक घटना घडली आहे. माढा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापलं. इतकंच नाही तर हे मुंडकं घेऊन तो बाईकवरुन गावभर फिरत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याने जमिनीच्या तुकड्यासाठी कुऱ्हाडीने वार करत चुलत्याची हत्या केली. शंकर जाधव अशी चुलत्याची ओळख पटली आहे. हत्या केल्यानंतर त्याने चुलत्याचं मुंडकं कापलं आणि ते बाईकवर घेऊन फिरला. जवळपास दीड तास तो रस्त्यावर मुंडकं घेऊन फिरत होता. हे चित्र पाहिल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर 10 ते 15 पथकं त्याच्या मागावर पाठवण्यात आली होती. पोलीस पाठलाग करत आहेत हे समजल्यानंतर आरोपीने माळीनगर येथे मुंडकं आणि दुचाकी फेकून दिली. पण अखेर त्याने माळीनगर येथे पोलिसांकडे शरणागती पत्करली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.