धक्कादायक! एका महिला लेफ्टनंट कर्नलवर तिच्या सहकारी अधिकाऱ्याने केला बलात्कार;बनविला व्हिडिओ, गुन्हा दाखल

Spread the love

वाराणसी :- लेहमध्ये तैनात असलेल्या एका महिला लेफ्टनंट कर्नलवर तिच्या सहकारी अधिकाऱ्याने घरी आणि नंतर हॉटेल मध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आझमगड येथील रहिवासी असलेल्या या महिला लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वाराणसी कॅंटॉन्मेंट पोलिस ठाण्यात बलात्कार, मारहाण, धमकावणे आणि हुंड्याची मागणी केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लेफ्टनंट कर्नल देवाशिष मुखर्जी (रा. काशिराज अपार्टमेंट, नदेसर) असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार वाराणसी कॅन्ट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान दोघांचेही लग्न ठरले होते. त्या आधी आरोपीने दुष्कृत्य केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला अधिकारी आणि आरोपी लेहमध्ये पोस्टिंगदरम्यान भेटले. यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली. दरम्यान, आरोपी देवाशिषने पीडित महिला अधिकाऱ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, पीडितेच्या घरच्यांनी हा प्रस्थाव मान्य करत लग्नाला मंजूरी देखील दिली.

दरम्यान, पीडिता ही काही कामासाठी जबलपूरला गेली होती. यावेळी २१ सप्टेंबर रोजी देवाशिषने विमानाचे तिकीट बुक करत पीडिता आणि तिच्या आईला भेटण्यासाठी वाराणसीला बोलावले. त्यांची घरी राहण्याची व्यवस्था केली. दरम्यान, या रात्री आरोपी पीडिटेच्या खोलीत गेला. लग्नाच्या बहाण्याने जबरदस्तीने त्याने पीडिटेशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला. देवाशिष हा समलैंगिक असल्याचा आरोप पिडीनेने केला आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी त्याच्या आरोपीच्या आईने हुंडा म्हणून ८० लाख रुपयांच्या घराची मागणी केल्याचे देखील पीडितेने म्हटले आहे. या सोबतच लग्नाच्या मिरवणुकीचा खर्च उचलण्यास सांगितले.

दोघांनी नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरोपी आणि त्याच्या आईने माफी मागीतली. दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेला हॉटेलमध्ये नेत बलात्कार केला. त्याचा व्हिडिओही बनवला. यानंतर तो तिला घरी घेऊन गेल्यावर तयाची आई पीडितेला शिवीगाळ करू लागली. याचा जाब विचारल्यावर आरोपीने पीडित महिलेवर चाकू हल्ला केला. या तून स्वत:ला वाचवले. यानंतर आरोपीने पीडितेला मंदिरात नेत जबरदस्तीने लग्न केले. यानंतर दोघेही घरी केले असता. पीडितेला पुन्हा हुंड्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास लग्नाला होकार देणार नसल्याचे सांगितले. दोघेही लेह युनिटमध्ये परत गेल्यावर देवाशिषच्या वागण्यात बदल झाला. त्याचा त्रास वाढत गेल्याने पीडितेने वाराणसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली.

हे पण वाचा

टीम झुंजार