जालना :- घर म्हटले की वाद होतातच पती -पत्नी मध्ये वाद होणे हे सामान्य आहे.वाद होतात आणि मिटतात देखील.पण बीड जिल्ह्यात बायकोसह सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नितीन विनायक शेळके असे या मयत जावयाचे नाव आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटना जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात लोणी गावातील नितीन विनायक शेळके यांचे लग्न माजलगाव तालुक्याच्या श्रीक्षेत्र बाभळगावच्या रुपाली रुस्तुम सुरवसे हिच्याशी 2020 साली झाला. 6 महिन्यानंतरच नवरा -बायकोत वाद सुरु झाले. त्यानां एक मुलगी झाली तिचे नाव नेहा ठेवले. नितीनला त्याची बायको रुपाली नेहमी वेगळे राहण्यासाठी बोलायची शेतीची वाटणी करण्यासाठी सतत बोलायची. त्यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. या वरून नितीनच्या सासरचे मंडळी नितीनला सतत मानसिक त्रास द्यायचे.

दरम्यान नितीनची बायको दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. त्याच्या मोठ्या मुलीचा नेहाचा वाढदिवस असल्यामुळे तो सासरी आला होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाले. यावरून सासरच्या मंडळीने देखील त्याला सुनावले. सततच्या सासरच्या मंडळी तसेच बायको कडून मिळणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाउल उचलले. त्याने विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले. या प्रकरणी नितीनचा भाऊ प्रशांत शेळके यांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींच्या विरोधात बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






