विवाहित महिलेच्या ‘त्या’ गुपिताचा गैरफायदा घेत तीन जणांनी केला सामूहिक बलात्कार

Spread the love

हिंगोली :- विवाहित महिलेवर तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली. हिंगोलीच्या थोरजपळा गावात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती आरोपींना मिळाली होती. याच माहितीचा गैरफायदा घेत आरोपींनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली होती. अनैतिक संबंध उघडकीस करण्याची धमकी आरोपींनी महिलेला दिली.

महिलेला ब्लॅकमेल करुन आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी लक्ष्मण पठाडे, रामप्रसाद पठाडे, ज्ञानेश्वर पठाडे या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर तीनही आरोपी फरार असून हिंगोली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांची दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार