Viral Video: गाडी चालवताना जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचा तरुणांचा उपदव्याप त्यांच्या स्वत:च्या जीवाबरोबर इतरांचा प्राण देखील धोक्यात घालू शकतो. हे माहीती असतानाही अनेक जण वाहन चालविताना वाहतूकीचे नियम सर्रास तोडताना दिसत आहेत. त्यामुळे आता अशा स्टंटबाजांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तुम्ही अनेकदा अनेक तरुणांना रस्त्यावर हुल्लडबाजी करताना पाहिलं असेल. अनेक मुलं रस्त्यावर गाडीवर चढतात आणि गाणी वाजवून धिंगाणा घालताना दिसतात.
असे तरुण अनेदा पोलिसांच्या तावडीतून सुटतात. पण प्रत्येक वेळी त्यांचं नशीब साथ देईलच असं नाहीहा व्हिडीओ रात्रीचा असून व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण चालत्या कारच्या छतावर हुल्लडबाजी करताना दिसत आहे. तर कारमधील त्याचे बाकीचे मित्र कारच्या खिडकीतून बाहेर डोकावत जोरजोराने ओरडत असताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार घडत असताना तेथीलच एका दुसऱ्या प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला होता. या तरुणांना स्वत:च्या जीवाची पर्वा आहे ना इतरांच्या असे त्यांचे वर्तन दिसत आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या कारचा पाठलाग करणाऱ्या गाडीतून हा व्हिडीओ चित्रीत केल्याचे दिसत आहे. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकल्यावर व्हायरल झाला आहे.

बंगरुळमध्ये धावत्या कारवर तरुणांची हुल्लडबाजीतरूण नुसते बाहेर आले नाहीत तर ते धावत्या करामधून डान्स करत आहेत. यात एका तरूण आपला शर्ट काढतो. शेवटपर्यंत तरूण थांबायचे नाव घेत नाहीत. या व्हिडीओतील कृत्य पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहे. संबंधित व्हिडिओ बेंगळूरू येथील असल्याचे समजत आहे. तरूणांचा व्हिडिओ रस्त्यावरील दुसऱ्या कारमधील प्रवाशांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या @sageshibbs या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवर पोस्ट करत बेंगळूरू पोलिसांना टॅग केला आहे.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.