हाय-प्रोफाइल गुन्हा! बारमेरमधील काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्यासह ८ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल.

Spread the love

जयपुर : एका महिलेने बारमेरमधील काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्यासह ८ जणांविरुद्ध जोधपूर येथील पोलीस ठाण्यात बलात्कार, POCSO आणि SCST अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. २०२१ ते २२ या काळात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे.तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यासोबतच इतर मैत्रिणींवर बलात्कार केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.

आमदार मेवाराम जैन आणि आरपीएस अधिकारी आनंद सिंह राजपुरोहित यांच्यासह आठ जणांविरुद्ध बलात्कार, मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. जोधपूरच्या राजीव गांधी नगर पोलिस स्टेशनमध्ये हा हाय-प्रोफाइल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिचे वडील आजारी पडले तेव्हा तिची ओळख राजकुमार नावाच्या व्यक्तीशी झाली होती.

राजकुमार हा बाडमेरचा आहे. त्यानंतर राजकुमारने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर बारमेरचे काँग्रेस नेते आणि आमदार मेवाराम जैन यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मेवाराम जैन याने तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर बलात्कार केला.पीडितेने पोलिसांना दिलेल्या अहवालात सांगितले की, मेवारामही तिच्या जोधपूर येथील घरी येत असे.

याठिकाणीही तिच्या घरात तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिच्या मुलीसमोर अश्लील कृत्य करण्यात आले आणि मुलीचा विनयभंगही करण्यात आला.इतर आरोपींनी तिला हे प्रकरण उघड न करण्याची धमकी दिली आणि काही कोऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, असा आरोपही तिने केला आहे.

टीम झुंजार