चाळीसगाव l प्रतिनिधी : – चाळीसगाव तहसील कार्यालयासमोरून दि 20 रोजी चोरीस गेलेली मोटारसायकल 22 रोजी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून मोटारसायकल सह चोरट्यास खडकी बायपास येथून ताब्यात घेतले आहे. सागर अजितराव देशमुख 35 इंजिनियर रा. लक्ष्मीनगर, परदेशी बोर्डिंग समोर, चाळीसगाव यांची 40 हजार रुपये किमतीची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमाक MH19 BA-0064 ही दि 20/12/23 रोजी तहसील कार्यालय समोरून दुपारी 12-30 ते 1-30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती
त्यांनी 2 दिवस तपास केल्यावर दि 22/12/23 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता एक संशयित इसम हिरापूर कडून चाळीसगाव कडे विना नंबरच्या मोटारसायकल वर येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक महेंद्र पाटील व कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गिते यांना मिळाल्यावर
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल सोनवणे, पोलीस नाईक महेंद्र पाटील, भूषण पाटील, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गिते, विजय पाटील, पवन पाटील, समाधान पाटील, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे, राकेश महाजन यांनी दि 22 रोजी सायंकाळी 7-30 ते 8-30 वाजेच्या सुमारास चेतन संतोष पाटील 28 रा शिवशक्ती नगर भडगाव रोड चाळीसगाव यास थांबवून मोटारसायकलचे कागदपत्रे विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर त्यास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला आणून पोलिसी खाक्या दाखवताच तहसील कार्यालयासमोरून वरील मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक भूषण पाटील करीत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.